आता जीवात जीव असेपर्यंत आंदोलन…

सरकारविरुद्ध अण्णांचा एल्गार : रामलीला मैदानावर आजपासून आंदोलन
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार लोकपाल लोकायुक्त कायद्याची अंमजबजावणी करीत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे अण्णा हजारे यांनी सांगितले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकारची झोप उडविल्यानंतर अण्णा हजारे उद्या शुक्रवारपासून नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरूध्द एल्गार पुकारणार आहेत.

दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात बोलताना अण्णा हजारे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चांगले बोलतात. परंतु, करीत काहीच नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लोकपाल/लोकायुक्त कायदा लागू करण्याची हमी प्रत्येक भाषणात देत होते. परंतु, सरकार येताच कोलांटउडी मारली. एवढेच नव्हे तर, देशात विरोधी पक्षनेते नसल्यामुळे लोकपालची नियुक्ती करता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिले.

महत्वाचे म्हणजे, नरेंद्र मोदी यांना देशातून भ्रष्टाचार मिटावा असे खरेच वाटत असते तर त्यांनी लोकपाल/लोकायुक्तची नियुक्ती केली असती. मात्र, आता सरकार लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. यात जीव गेला तरी हरकत नाही, असे अण्णा यांनी यावेळी स्पष्ट केले.

मोदी यांच्या सरकारला चार वर्षांचा कालावधी दिला. सरकार आल्यानंतर ते काहीतरी करतील असे वाटत होते. परंतु, काहीही केले नाही. लोकायुक्ताच्या नेमणुकीसाठी 43 पत्रे लिहिलीत. पण एकाचेही उत्तर मिळाले नाही. रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यास टाळाटाळ केली. मात्र, तुरूंगात आंदोलन करीन, असे पत्र लिहिताच सरकार हादरले आणि गृह मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्तक्षेपानंतर परवानगी मिळाली, असे अण्णांनी सांगितले.

यापूर्वीच्या आंदोलनातून राज्यपाल किरण बेदी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया निघालेत. पण ती चूक आता पुन्हा करणार नाही. यापैकी कुणालाही व्यासपीठावर सोडा, पायरीपर्यंत सुध्दा येवू दिले जाणार नाही. व्यासपीठावर सामील होणाऱ्या प्रत्येकाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे. आतापर्यंत जवळपास सहा हजार नागरिकांनी अशाप्रकारचे प्रतिज्ञापत्र जमा केले असल्याचे अण्णांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)