आता जनता भाजपची धुलाई केल्याशिवाय राहणार नाही – अजित पवार 

कोल्हापूर:  ‘खुद्द नितीन गडकरी म्हणालेत की, आश्वासनांची पूर्तता केली नाही तर जनता धुलाई केल्याशिवाय राहत नाही. मग आता जनता भाजपची धुलाई केल्याशिवाय नक्कीच राहाणार नाही,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी या सभेत व्यक्त केले. भुदगरड तालुक्यातील मुदोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवर्तन यात्रेची सभा आज झाली. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

भाजपाचे अनेक नेते साखर कारखान्यांशी संबंधित आहेत. तरीही उस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी नाही. साखरेला भाव नाही. मग उस पिकवणारा शेतकरी कसा टिकेल? शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला वीज नाही. त्यामुळे एनडी पाटील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढला. सरकार म्हणते आहे की, जानेवारी महिन्याच्या शेवटी निर्णय घेऊ. जानेवारीच्या शेवटी काय मुहूर्त काढला आहे का, असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.

-Ads-

कोल्हापुरात एकही नवा कारखाना या सरकारने आणला नाही. या सरकारच्या काळात मुलांना रोजगार मिळत नाही. केमिकल इंजिनिअरिंग शिकलेल्या मुलीला राज्यात चहा विकावा लागतो आहे. असे का, याचे उत्तर या सरकारने द्यायला हवे. मोदी सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या जाहिरातीसाठी प्रचंड पैसा खर्च केला. पण या योजनेतील ५६% निधी हा फक्त जाहिरातींवर वापरला गेला. सगळीकडे फक्त मोदींचेच चेहरे दिसतात आणि महाराष्ट्रात तर उद्धव ठाकरे म्हणतात युती गेली खड्ड्यात… अरे लोकं खड्ड्यात जाण्याची वेळ आली आहे. युती कसली घेऊन बसलात, असा टोलाही त्यांनी लगावला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)