आता चीन बनवणार प्रती तास ६०० किमी वेगाने धावणारी लेविटेशन ट्रेन

पेईचींग :   चीनमधील ट्रेनचा वेग आणखी वाढणार आहे. मेट्रो, बुलेट आदी गोष्टींचा प्रयोग चीनने केव्हाच यशस्वी केला आहे. त्यानंतर आता प्रती तास ६०० किमी वेगाने धावेल, अशी चुंबकीय लेविटेशन ट्रेन बनवण्याची महाकाय योजना चीनने डोळ्यासमोर ठेवली आहे.
या प्रकल्पाला चीनच्या सरकारने मान्यताही दिली आहे. हा प्रकल्प राबवणारी सरकारी कंपनी सीआरआरसी किंगदाओ सिंफांग कंपनी लिमिटेडने याबाबत माहिती दिली आहे. चीनच्या सरकारी मीडियाने सांगितले की, तब्बल १९ अभ्यासक आणि संशोधकांच्या चमूने या प्रकल्पाच्या तांत्रीक बाबी तपासून पाहिल्या आहेत.
या प्रकल्पावर सखोल आणि विस्तारीत चर्चा केल्यावर या योजनेला २५ जानेवारीला सरकारने बहुमताने मान्यता दिली. ही योजना २०१६ मध्ये विज्ञान अर्थातच प्रादयौगिकी मंत्रालयाने स्थापन केलेल्या १८व्या राष्ट्रीय प्रमुख संशोधन आणि विकास प्रकल्पांपैकी एक असलेल्या योजनांपैकी एक आहे. वेगावर स्वार होणाऱ्या या योजनेबद्धल चीनमधील नागरिकांना प्रचंड उत्सुकता असून, लवकरच चीन सरकार या महत्त्वपूर्ण योजनेवर काम करायला सुरूवात करणार आहे.
दरम्यान, या आधी सखोल अभ्यास केल्यावर ताशी ६०३ किलोमिटर प्रति तास वेगाने धावणारी चुंबकीय लिवेटेशन रेल्वे चालवली होती. जर्मनीत तयार झालेली रेल्वे ५०५ किलोमिटर प्रति तास वेगाने धावू शकते. पण, जगभरातील काहीच देशांमध्ये अशा वेगवान ट्रेन आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)