आता चीनमध्ये पाहिजे तेव्हा पडणार पाऊस

बीजिंग (चीन) – माणसाला पावसासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागणे ही तर युगायुगाची गोष्ट आहे. पेरणीसाठी पावसाची चातकासारखे वाट पाहणारे शेतकरी जगभरात आहेत. आणि पावसाने दगा दिला, पिके आली नाहीत म्हणून निराश होणारे, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही दिवसेदिवस वाढत आहे. पण आता हे चित्र चीनमध्ये बदलणार आहे. ढगांना आकर्षित करून घेणारा, पाऊस पाडणारा एक प्रकल्प चीन करत आहे. आणि हा यशस्वी झाल्यानंतर चीन आपल्या मर्जीनुसार हवा तेव्हा पाऊस पाडू शकणार आहे.

या प्रकल्पांतर्गर्त जवळपासच्या क्षेत्रात 10 अब्ज घनमीटर्स पर्यंत अधिक पाऊस पडू शकणार आहे. घन इंधनावर चालणाऱ्या भट्ट्यांचे नेटवर्क चीनने तिबेटच्या उंच पर्वतांवर तयार केले आहे. प्राणवायूचे प्रमाण कमी असलेल्या 5000 मीटर्सपेक्षा अधिक उंचीवरही या भट्ट्या पेटवता येणार आहेत. एकदा पेटवल्यानंतर महिनेच्या महिने त्या धगधगत राहतील अशी त्यांची रचना आहे. या भट्ट्या ढगांना आपल्याकडे आकर्षित करू शकणार आहेत. आणि परिणामी पावसाचे प्रमाण वाढणार आहे.

या प्रणालीची निर्मिती चीनच्या एरोस्पेस सायन्स टेक्‍नॉलॉजी कॉर्पोरेशन ने केली असून भट्ट्यांचे डिझाईन स्पेस सायंटिस्टसनी केले आहे. याचबरोबर ढग खाली आणण्यासाठी ड्रोन्स आणि विमानांची निर्मिती करण्यात येत आहे.
अशा तंत्रज्ञानाचा उपयोग पूर्वी अमेरिकेने केला आहे. परंतु चीन याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले चीन चा हा प्रयोग जर यशस्वी झाला तर नैसर्गिक रित्या इतर देशांवर जमणारे पावसाचे ढग आपल्या चीन देशाकडे आकर्षून घेऊन ज्या देशात दुष्काळ पडावा असे चिल ला वाटेल त्या देशात चीन दुष्काळ पाडण्याची शक्यता आता नाकारता येत नाही ज्या अर्थी अमेरिकेने हा प्रयोग केल्याचे नमूद केले आहे त्या वरून हा यशस्वी प्रयोग मोठ्ठया प्रमाणात नकीच करणार व त्यात यशस्वी सुद्धा होणार भारतीय शास्त्रज्ञ ह्यावर आता कोणता उपाय शोधणार ? चीन चा हा प्रकल्प अयशस्वी करायचा असेल तर आकाशात जमणारे पावसाचे नैसर्गिक ढग तयारच होणार नाही असा शोध लावणे हाच एकमेव उपाय सुचतो तसे पाहता आपला देश दररोज एक रॉकेट कुठेनाकुठे पाठवतच आहे त्याचा कितपत फायदा होतो तो देवालाच माहीत पण पैसे तिजोरीतून नियमित खर्च होत आहेत किंवा दुसरा उपाय म्हणजे समुद्राचे संपूर्ण पाणीच आटविणे ह्यावर वाचकांनी त्यांना सुचणारे उपाय सुचवावेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)