आता चांद्रयान-2 मोहीम ऑक्टोबरमध्ये पार पडणार

चेन्नई : पुढील महिन्यात होणाऱ्या चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाला ऑक्टोबरपर्यंत टाळण्यात आल्याची माहिती इस्रोने दिली. अलिकडेच एकत्र आलेल्या तज्ञांनी काही शिफारसी केल्या आहेत. या शिफारसींच्या अंमलबजावणीमुळे हे प्रक्षेपण आता ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

चांद्रयान-2 मोहीम एप्रिलमध्ये नव्हे तर ऑक्टोबरमध्ये पार पडेल असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले. एप्रिलमध्ये इस्रो पहिल्यांदाच चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर यान उतरवण्याचा प्रयत्न करेल असे विधान पीएमओ राज्यमंत्री आणि अंतराळ विभागाचे प्रभारी जितेंद्र सिंग यांनी केले होते.

800 कोटी रुपयांच्या या मोहिमेचे प्रक्षेपण एप्रिल ते नोव्हेंबर 2018 दरम्यान होईल. प्रशिक्षण एप्रिलमध्ये करण्याचा प्रयत्न होता, परंतु ते आता पुढे ढकलण्यात आल्याचे सिवन म्हणाले. इस्रोनुसार चांद्रयान-2 पूर्णपणे स्वदेशात विकसित मोहीम आहे. चांद्रयान-2 अंतराळ यानाचे वजन सुमारे 3290 किलोग्रॅम आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)