आता कोरेगावचे इतर अवैध धंदे कधी बंद होणार ?

पोलिस-अवैध व्यवसायिकांचे अर्थपूर्ण संबंधांची चर्चा

कोरेगाव- कोरेगाव शहरात मुंबई-कल्याण मटक्‍याच्या गेल्या पंधरवड्यात टाकलेल्या दोन छाप्यां नंतर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे. असे असले तरी शहरासहीत परिसरात पोलिसांच्या छत्र छायेखाली फोफावलेल्या व राजरोस सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्याना कधी आळा बसणार असा प्रश्न उपस्थीत होत आहे. अकार्यक्षम कोरेगाव पोलिसांना अंधारात ठेवून रहिमतपूर पोलिसांना बरोबर घेवून मटका अड्डावर केलेल्या कारवाई बद्दल जिल्हा पोलिस प्रमुख कोरेगाव पोलिस निरीक्षकांना जाब विचारणार का, असा ही प्रश्न कोरेगावकरांच्या मनात आहे.

-Ads-

जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील मटका व्यवसाया बरोबर अनेक बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. परंतु कोरेगाव शहरासह परिसरात मात्र पोलिसांच्य छत्र छायेत हे धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. कोरेगाव शहरात चार मटका बुकींसह जवळपास छत्तीस एजंट राजरोसपणे मटका घेत आहेत. शहरातील आझाद चौक, दगडीचाळ, केदारेश्वररोड, नवीन एस. टी. स्टॅंड परिसर, स्मारक, बुरूडगल्ली, जानाई गल्ली, सुभाषनगर, बाजारपेठ, आंबेडकर नगर, आरफळ कॉलनी, आण्णाभाऊ साठे नगर, गोसावी वस्ती, कुमठे फाटा, ल्हासुर्णे फाटा, महादेव नगर रस्ता, रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर, एकंबेरोड, बरोबर तालुक्‍यातील किन्हई, सातारारोड, ल्हासुर्णे इ. ठिकाणी मटका घेतला जातो. मटका व्यवसाया बरोबर शहरातील परवाना धारक दारू विक्रेत्यांकडून तालुक्‍यात बेकायदेशीर रित्या दारू विक्री करणाऱ्या व्यवसायीकांनाही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या दारू विकली जात आहे.

परवानाधारक दारू विक्रेत्यांकडून तालुक्‍यातील अनेक गावात बेकायदेशीर दारू विक्री करणारे एजंट नेमले आहेत. दारू पित नसतानाही विक्रेत्या बरोबर आपल्या घरातील मुला-बाळांसह अनेकांच्या नावाने दारू पिण्याचे परवाने काढून ठेवले आहेत. त्यामुळे त्यांना परवान्या प्रमाणे दारूच्या बाटल्या घरात विक्रीसाठी ठेवण्याची परवानगीच मिळाली आहे. या विक्रेत्यांच्या घरापर्यंत राजरोसपणे रिक्षा , टॅम्पोतून दारू पोहचविण्याचे काम करत असतात. तसेच शासनाच्या ड्रायडे दिवशीही दुकाना बाहेर मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जाते. आरफळ कॉलनीत मटका अड्यावर कारवाई केली असली तरी इतर ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यावर का कारवाई होत नाही? या गोष्टी आर्थिक व्यवहारांशीवाय होतात का अशी ही चर्चा कोरेगावात सध्य सुरु आहे.

कोरेगाव शहरात बेकायदेशीर धंद्याबरोबर मोठया प्रमाणात रात्रीच्या वेळी घर फोडीचे प्रकार सुरू आहेत. या घर फोडीत लाखों रुपयांचे ऐवज चोरीला गेले आहेत. चोरीचा तपास करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. तीनशे दोन सारखे अनेक गुन्हे घडत असताना आरोपींवर कारवाई करण्यात कोरेगाव पोलिसांना अपयश आले आहे. कोरेगाव तालुक्‍यात महसुल विभाग सक्षम असताना ही बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कोरेगाव पोलिसांनी आपले सर्व लक्ष केंद्रित केले आहे. आपले महत्वाचे काम सोडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे कार्य सध्या कोरेगाव पोलिस करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)