आता कुमारस्वामींनीच दिला राजीनाम्याचा इशारा !

कॉंग्रेस आमदाराच्या वक्तव्यावर नाराज होऊन दिली प्रतिक्रीया ; आमदारावर कॉंग्रेस बजावणार नोटीस

बंगळुरू: कर्नाटकातील कॉंग्रेसच्या एका आमदाराने सिद्धरामैय्या यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी केल्यामुळे नाराज झालेले कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्वत:च राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. आपण सत्तेचे लोभी नाही आपली राजीनामा देण्याची तयारी आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेला आता वेगळेच वळण लागले आहे. दरम्यान कॉंग्रेसने संबंधीत आमदारावर नोटीस बजावली जाईल असे म्हटले आहे.
कर्नाटकातील कॉंग्रेसचे आमदार एसटी सोमशेखर यांनी काल रविवारी एका कार्यक्रमात बोलताना कुमारस्वामी यांच्या कारभारावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील विकासकामे थंडावली आहेत असे नमूद करीत त्यांनी सिद्धरामैय्या यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रीया देताना मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले की माझ्या कामाविषयी तुम्ही नाराज असाल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मला पदाची हाव नाहीं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या सरकारमुळे राज्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत हा दावा त्यांनी खोडून काढला. ते म्हणाले की आपल्या सरकारने सत्तेवर आल्यापासून एक लाख कोटी रूपयांच्या खर्चाची कामे हाती घेतली आहेत असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. या कामांची यादीही त्यांनी पत्रकारांना सादर केली. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेच्यावेळी कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडुराव हेही तेथे उपस्थित होते त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदाराने असे वक्तव्य करणे योग्य नाही अशी जाहीर नाराजी व्यक्‍त करीत कुमारस्वामी यांचे समर्थन केले. कुमारस्वामी यांच्या काळात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. आजच आठ हजार कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पाचे काम सुरू होत आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. संबंधीत आमदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल असेही त्यांनी जाहीर केले. मागील सिद्धरामैय्या सरकारच्या प्रकल्पांनाही कुमारस्वामी यांनी चालना दिली असल्याचे गुंडूराव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)