आता कर्जतला मिळणार अग्निशमन सेवा

कर्जत – महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत अग्निशमन आप्तकालीन सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान राबविले जात आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांच्या शिफारसीनुसार कर्जतचा समावेश करण्यात आला आहे.

कर्जत नगरपंचायतचे तत्कालीन नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी याबाबत प्रस्ताव करून पाठपुरावा केला होता. जानेवारी 2018 मध्ये नगरविकास विभागाकडे हा प्रस्ताव सादर केला होता. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न केला होता. नगराध्यक्षा प्रतिभाताई भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत व सर्व नगरसेवक-नगरसेविका यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. यासाठी 2 जानेवारी 2019 रोजी 1 कोटी, 8 लाख, 72 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी 64 लाख रुपये नगरविकास विभागामार्फत व उर्वरित 44 लक्ष नगरपंचायत 14 वा वित्त आयोग निधीतून वापरण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये अग्निशमन वाहन, अग्निशमन कार्यालयीन इमारत, कर्मचारी स्टाफ, क्वॉर्टरअंतर्गत डांबरी रस्ते, संरक्षण भिंत, गाडी पार्किंग, शेड, वॉचमन कॅबीन, पाण्याची टाकी आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. आपत्कालिन परिस्थितीमध्ये कर्जत शहरास श्रीगोंदा, जामखेड नगरपालिकेच्या वाहनावर अवलंबून रहावे लागत होते. यासाठी कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक- नगरसेविका व कर्मचारी यांचे योगदान आहे.

नवीन वर्षातील पहिली भेट

नगरपंचायतीच्या स्थापनेपासून कर्जतला कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. पालकमंत्री प्रा. राम शिंदे व उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या प्रयत्नाचे हे यश आहे. अग्निशामक केंद्र ही कर्जतकरांसाठी नवीन वर्षातील पहिली मोठी भेट असल्याची प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)