आता करा फक्त १९९९ रूपयांत भारताबाहेर विमानप्रवास !

 मुंबई :  एअरलाईन्स कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे आता ग्राहकांनादेखील नवनव्या ऑफर्सने आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एअर एशियाने यापूर्वी ९९९ रूपयांमध्ये भारतात विमानप्रवास करण्याची सोय उपलब्ध केली होती. आता भारताबाहेर विमानप्रवासासाठी केवळ १९९९ रुपयात ही सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
एअर एअशियाची ही खास ऑफर मर्यादित वेळेसाठी आहे. या ऑफरचा वेळीच फायदा घेतल्यास १९९९ रूपयांत थेट भारतातबाहेर विमान प्रवास करण्याचे अनेकांचे स्वप्न साकार होणार आहे. १ मार्च २०१८ ते २१ नोव्हेंबर २०१८ या काळात प्रवास करणार्‍यांसाठी ही खास सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या बिग सेल ऑफरसाठी १७ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू करण्यात येणार आहे.
इंटरनॅशनल विमान प्रवासासाठी तुम्ही १९९९ रूपयात विशाखापट्टणम ते क्वालालंपूर असा प्रवास करू शकाल. कोची ते  क्वालालंपूर आणि तिरूचिरपल्ली ते क्वालालंपूर या प्रवासासाठी २९९९ रूपये आकारण्यात येणार आहेत. एअर एशियातर्फे  रांची ते बंगलुरु, हैदराबाद ते भुवनेश्‍वर या फ्लाइट्स  सुरू करण्याबाबतही विचार करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)