मुंबई : गुगलने आपल्या गुगल ट्रान्सलेट या अॅपच्या ऑफलाईन वापराचा विस्तार करत यात मराठीसह एकूण सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे. गुगलने आधीच इंग्रजी व हिंदी भाषांसाठी आपली गुगल ट्रान्सलेट ही सेवा ऑफलाईन वापरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या अॅपच्या ताज्या अपडेटच्या माध्यमातून याचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये आता मराठीसह तामिळ, तेलगू, कन्नड, गुजराथी, बंगाली व उर्दू अशा एकूण सात भारतीय भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.
अर्थात, आता इंटरनेट नसतानाही कुणी या सात भाषांमध्ये अनुवादाची सुविधा वापरू शकणार आहेत. यासाठी गुगल ट्रान्सलेटच्या अॅपची ताजी आवृत्ती आणि ऑफलाईन युजसाठी असणार्या टुल्सचे पॅकेज डाऊनलोड करावे लागणार आहे. यासाठी सुमारे ३० मेगाबाईट इतका डाटा लागणार आहे. तथापि, एकदा का हे अपडेट इन्स्टॉल झाले की मग इंटरनेटविना अनुवाद करता येणार आहे. यात संबंधीत अपडेट इन्स्टॉल करतांनाच ते कोणत्या भाषेत वापरायचे आहे याची सेटींग करावी लागणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा