आता एक नाही तर, अधिक गोळ्या घ्यावा लागणार

एफडीसीच्या 329 प्रकारच्या औषधांवर केंद्र सरकारने घातली बंदी

पुणे – एका औषधामध्ये एकापेक्षा अधिक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे असे एकापेक्षा अधिक औषधी घटक (मॉलिक्‍यूल) मिळून एकच औषध तयार केलेल्या “फिक्‍स्ड डोस कॉम्बिनेशन’ (एफडीसी) असलेल्या 329 प्रकारच्या औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पुण्यातील औषध विक्रेत्यांनीदेखील आता ही औषधे देणे बंद केले आहे. यामुळे औषधांची कमतरता भासणार नाही तर, ग्राहकांना एकापेक्षा अधिक औषधे खरेदी करावी लागतील, असे औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारकडून अनेक रोगांवर एकच उपचार करणारी काही औषधे बंद करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. हा निर्णय केंद्र सरकारच्या “ड्रग टेक्‍नॉलॉजी ऍडवायजरी बोर्डा’च्या शिफारशीनुसार घेण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्हा औषध विक्रेता संघटनेचे विजय चंगेडिया म्हणाले की, शासनाच्या आदेशानुसार ही औषधे तत्काळ बंद करण्यात यावीत. त्यानुसार या औषधांची खरेदी विक्री जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी थांबवली आहे. तसेच बंदी घातलेल्या घटकांतील किती औषधे येतात, याचा अभ्यासही सुरू आहे. मात्र, या निर्णयामुळे गोळ्यांची संख्या वाढेल. परंतु, त्यांना सर्व औषधे उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

परदेशात बंदी असलेले अनेक एफडीसी औषधे आपल्याकडे रूग्णांना सर्रासपणे दिली जातात. विशेष बाब म्हणजे या एफडीसी औषधांपासून तयार होणाऱ्या संयुगामुळे मानवी शरीरावर त्याचे काय परिणाम होतात, याची कोणतीही चाचणी न घेता व त्याचा काय परिणाम होतो हे न पाहताच, ती दिली जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे होते, त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)