आता आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्याचा चीन दौरा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर हे चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चीन येथे 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर होणा-या कार्यशाळेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यासाठी येणाऱ्या 75 हजार रुपयांचा खर्चाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे परदेश दौरे सुरुच आहेत. नुकतेच स्मार्ट सिटीचे संचालक असलेले पदाधिकारी आणि अधिकारी बार्सिलोनाचा दौरा करुन आले आहेत. या दौऱ्यावर टीका होत असतानाच आता आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर चीन दौऱ्यावर जाणार आहेत.

फॉरेन अफेअर्स ऑफीस ऑफ बिजींग म्युनिसिपल गव्हर्मेंट आणि बिजींग एनव्हायरन्मेंटल सॅनिटेशन इंजिनिअरिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने चीन येथील बिजींग शहरात सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान कार्यशाळा आयोजित केली आहे. महापालिकेतील शहरी स्वच्छता व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याला या कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्याला आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर जाणार आहेत. कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी प्रवास खर्चास येणाऱ्या 75 हजार रुपयांचा खर्चाला स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)