आता आयुक्‍तांची “सटकली’

पिंपरी – अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वारंवार टीकेचा सामना करावा लागणाऱ्या महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी आपला दांडपट्टा फिरवायला सुरूवात केली आहे. कर्तव्यात सचोटी न राखल्याबद्दल सहाय्यक आयुक्‍त आण्णा बोदडे आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे यांना प्रत्येकी दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांना सक्‍त ताकीद देण्यात आली आहे. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आण्णा बोदडे यांच्याकडे क क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीयअधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार आहे. तर याच क्षेत्रीय कार्यालयात बाबासाहेब कांबळे हे सहाय्यक आरोग्य अधिकारीपदी कार्यरत आहेत. आप-आपल्या कार्यक्षेत्रातील साफसफाईची कामे करुन घेण्याची जबाबदारी या दोन्ही अधिकाऱ्यांची आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 23 ऑक्‍टोबरला क क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारितील क्षेत्राची अचानक पाहणी केली असता, बहुतेक सर्व परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचून दुर्गंधी पसरल्याची बाब आढळली. अशा दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांनी साफसफाईविषयक कामकाजात गांभिर्याने लक्ष घालून जबाबदारीपूर्वक कामकाज करुन घेत नसल्याची बा निदर्शनास आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पार्श्‍वभूमीवर दोन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या दोन्ही अधिकाऱ्यांनी सादर केलेले खुलासे संयुक्‍तिक वाटत नसल्याने त्यांच्यावर प्रत्येकी 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या मासिक वेतनातून ही रक्कम कपात केल जाणार आहे. हे दोन्ही अधिकारी कर्तव्याप्रती नितांत सचोटी व कर्तव्य परायणता राखत नसून, कर्तव्यात कसूर केल्याचे या आदेशात नमूद केले आहे.

महापालिका आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्‍त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. महापालिकेच्या अजंठानगर, मिलींदनगर प्रकल्पातील घरकुलांचे काम पूर्ण होऊनही त्यांचे अद्यापही वाट पूर्ण झालेले नाही. याशिवाय वेताळनगर पुनर्वसन प्रकल्पाबाबत मोठ्या संख्येने तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. यामुळे इंदलकर यांना कारने दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर लाभार्थ्यांचा सहभाग व प्रतिसाद असल्याशिवाय कामकाज पूर्ण होवू शकत नाही. लाभार्थ्यांनी अद्यापही स्वहिश्‍याची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे सदनिका वाटप प्रक्रिया राबविण्यास अडचण निर्माण होत असल्याचा खुलासा इंदलकर यांनी सादर केला आहे. मात्र. हा खुलासा आयुक्त हर्डीकर यांना संयुक्‍तिक वाटला नाही. हा खुलासा लक्षात घेता, त्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 72 (क) चा भंग केल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळे त्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. भविष्यात त्यांच्याकडून कर्तव्य पालनात कसूर झाल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

आठवडाभरात सात अधिकाऱ्यांवर कारवाई
प्रशासनातील कामकाजाबाबत आग्रही असलेल्या महापालिका आयुक्तांकडून गेल्या आठवडाभरात एकूण सात अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये भ्रष्टाचाराला पूरक वातावरण नर्माण केल्याप्रकरणी क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, उपलेखापाल राजश्री देशपांडे यांच्यावर अनुक्रमे 500 रुपयांची दंडात्मक कारवाई व एक वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. याशिवाय विभाग प्रमुखांच्या अनुपस्थितीत स्थायी सभेला गैरहजर राहणारे प्रशासन अधिकार राजीव जाधवर आणि राजेश जगताप यांना सक्‍त ताकीद देण्यात आली आहे. आण्णा बोदडे, बाबासाहेब कांबळे आणि चंद्रकांत इंदलकर यांची त्यात भर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)