आता अमेरिकेची परदेशातील कॉलसेंटरकडेही वक्रदृष्टी

वॉशिंग्टन – अमेरिकन कॉंग्रेसमध्ये कॉल सेन्टरसंदर्भात नवीन कायदा सादर करण्यात आला आहे. या नवीन कायद्यानुसार भारतासारख्या देशात असणाऱ्या कॉल सेन्टरमधील कर्मचाऱ्यांना आपल्या ठावठिकाणाची माहिती द्यावी लागेल. ग्राहकांना अमेरिकेतील असणाऱ्या सेवा केंद्रात कॉल ट्रान्स्फर करण्याचा अधिकार द्यावा लागणार आहे. ओहियोचे डेमोक्रॅट सिनेटर शेरॉड ब्राऊन यांनी हा कायदा सादर केला.

या कायद्यातील तरतुदीनुसार कॉल सेन्टरमधील नोकरीचे आऊटसोर्स करणाऱ्या कंपन्यांसाठी एक सार्वजनिक यादी तयार करावी लागणार आहे. ज्या कंपन्यांनी अमेरिकेच्या बाहेर कॉल सेन्टर स्थापन केलेला नाही, त्यांना सरकारकडून सवलत देण्यात येईल. अनेक अमेरिकन कंपन्यांनी देशातील कॉल सेन्टर बंद करण्याचा निर्णय घेत भारत अथवा मेक्‍सिकोमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मोठया प्रमाणात अमेरिकेतील रोजगारावर संकट आले. अमेरिकेत पुन्हा रोजगारनिर्मिती होण्यासाठी देशातच कॉल सेन्टर सुरू होण्याची आवश्‍यकता आहे, असे त्यांनी म्हटले.

अमेरिकेच्या कम्युनिकेशन्स वर्कर्सच्या अहवालानुसार, भारत आणि फिलीपाईन्समध्ये सर्वाधिक कॉल सेन्टर सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. बीपीओ क्षेत्रातून भारताला मिळणारा वार्षिक महसूल 1.82 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याव्यतिरिक्त इजिप्त, सौदी अरेबिया, चीन आणि मेक्‍सिकोमध्ये कॉल सेन्टर सुरू करण्यात येतात. बीपीओ क्षेत्रात भारताचा दबदबा आहे. या क्षेत्रातून मिळणारा वार्षिक महसूल 1.82 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
दरम्यान बौद्धिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून नवीन निर्णय घेण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे चीनला वार्षिक 60 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागेल. हा कायदा शुक्रवारी सादर करण्यात येईल. ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांना हा आकडा 30 अब्ज डॉलर्सपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तो ट्रम्प यांनी दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. हे पॅकेज 100 पेक्षा अधिक उत्पादनांना लागू होणार आहे. चीनविरोधात हा मोठा निर्णय असल्याचे समजते. अमेरिकेने या अगोदरही काही धातूवरील आयात शुल्क वाढविल्यामुळे भारत नाराज झालेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)