आता अण्वस्त्र परीक्षण नाही; किम जोंग यांची घोषणा

प्याँगयांग  – उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नसल्याची घोषणा केलीये. किम जोंग उन यांनी फक्त घोषणाच केली नाही तर त्याचे केंद्रही बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. उत्तर  कोरियाने जाहीर केलेला हा निर्णय खरोखरच स्वागतार्ह आहे असे ट्रम्प यांनी  जोंग यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे.

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी या आधी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याने अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव वाढला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून किम जोंग यांनी नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही देशांमध्ये तर परस्परांविरोधात युद्ध करण्याचीही घोषणा झाली होती. मात्र तसे काही घडलेले नाही, उलट किम जोंग यांनी आपला निर्णय बदलत यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणस्त्रांचे परीक्षण करणार नसल्याचे म्हंटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)