आतापर्यंत 489.51 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

File Photo

पुणे – राज्यात सध्या गळीत हंगाम वेगात सुरू असून आतापर्यंत सुमारे 461.99 लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून 489.51 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदाचा गाळप हंगाम फेब्रुवारी अखेरपर्यंत चालेल अशी शक्‍यता आहे.

यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात गळीत हंगाम लवकर सुरू करण्यात आला. पण, डिसेंबरपासून खऱ्या अर्थाने सर्व कारखाने वेगाने सुरू झाले. सध्या राज्यात तब्बल 185 साखर कारखाने सुरू आहे त्यातील 99 सहकारी व 86 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत 411.21 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन 424.50 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी पेक्षा यंदा गाळप हंगामाचा वेग जास्त आहे, पण गेल्या वर्षी मे अखेर गाळप हंगाम सुरू होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात सध्या पुणे विभागात सर्वाधिक म्हणजे 62 कारखाने सुरू आहेत. त्यात 31 सहकारी व तेवढेच खासगी कारखाने आहेत.याशिवाय कोल्हापूरमध्ये 36, तर नांदेडमध्ये 32 साखर कारखाने सुरू आहेत. नगर-28, तर औरंगाबाद विभागात 22 कारखाने सुरू आहेत.

राज्यात आगामी काळात दुष्काळाच्या झळा तीव्र होणार आहेत. त्यामुळे उसाला पाणी कमी पडण्याची शक्‍यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सध्या राज्यात ऊस तोडणी वेगात सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)