आतापर्यंत आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी केल्या सर्वाधिक धावा

मुंबई : आयपीएल 2018 साठी लिलाव पूर्ण झाला आहे. भारताचा जयदेव उनाडकटने सर्वांनाच थक्क केले आहे. आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.
आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये सर्वच संघ संतुलित दिसत आहेत. कोणती टीम यंदाचा आयपीएल कप जिंकते याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. बॅट्समनच्या कामगिरीवर संपूर्ण सामना अवलंबून असतो. त्यामुळे कोणते बॅट्समन यंदाच्या सीजनमध्ये कमाल करतात हे पाहायला लागेल.  दरम्यान, सुरेश रैनाने आतापर्यंत 157  सामने खेळत  4540 धावा काढल्या आहेत. त्याच बरोबर  विराट कोहलीने  141  सामने खेळत  4418 धावा काढल्या, रोहित शर्माने 154  सामने खेळत  4207 धावा काढल्या आहेत. तसेच  गौतम गंभीरनेदेखील 147 सामने खेळत  4132 धावा काढल्या तर  डेविड वॉर्नरने 114 सामने खेळले असून  4014 धावा काढल्या आहेत. त्यामुळे आता या मोसमात कोण जास्त धावा काढणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)