आता”नासा’ची सूर्यावर मोहिम 24 तास पुढे ढकलली

ताम्पा (अमेरिका) – “नासा’ची महत्वाकांक्षी पहिल्यावहिल्या सूर्य मोहिमेला उद्या सुरुवात होत आहे. सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आणि सूर्याशी संबंधित कित्येक रहस्यांचा उलगडा करण्यासाठी ही मोहिम आजपासून सुरू होणार होती. मात्र त्या मोहिमेला 24 तास उशीराने सुरुवात होणार आहे. या म्हिनेच्या वेळापत्रकामध्ये हा बदल करण्यामागील कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

“पार्कर सोलार प्रोब’ असे नाव असलेल्याया मोहिमेलासाठी 1.5 अब्ज डॉलर इतका प्रचंड खर्च येणार आहे. नासाच्या विज्ञान विभागाचे संचालक थॉमस झुर्बचेन यांच्या नेतृत्वाखाली ही महत्वाकांक्षी मोहिम राबवली जात आहे. “नासा’च्या आतापर्यंतच्या या सर्वात महत्वाच्या या मोहिमेच्या यशस्वितेसाठी इंजिनिअर सर्वाधिक काळजी घेत आहेत. अंतराळात हेलियम वायूचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणास्तव ही मोहिम पुढे ढकलली गेल्याचे समजते आहे. बदललेल्या वेळापत्रकानुसार रविवारी पहाटे 3.31 मिनिटांनी या महत्वाकांक्षी मोहिमेला सुरुवात होईल. त्यावेळी अंतराळातील हवामानाची स्थिती 60 टक्के अनुकूल असण्याची शक्‍यता आहे, असे “नासा’ने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आतापर्यंत कोणतेही अंतराळ यान सूर्याच्या निकट जाऊ शकलेले नाही. सूर्याच्या भोवतालच्या “कोरोरिया’ या वातावरणाच्या आवरणाचा विशेष अभ्यास करण्यासाठी हे मानवरहित यान पाठवले जाणार आहे. हे वातावरणाचे आवरण सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा 300 पट अधिक उष्ण आहे. त्यातून ताकदवान प्लास्मा, उर्जा घटक बाहेर फेकले जात असतात. तेथील भौगोलिक चुंबकीय वादळेही निर्माण होतात. त्यामुळेच पृथ्वीवरौर्जाप्रकल्पांमध्ये अडथळेही निर्माण होऊ शकतात. सौरविस्फोटांबाबत विशेष माहिती उपलब्ध नाही. मात्र त्यामुळे लक्षावधी लोकांपर्यंत उर्जा पोहोचवली जाऊ शकते, एवढी त्यात क्षमता असते.

सूर्याच्या उष्णतेपासून सुरक्षित राहण्यासाठी “नासा’चे हे सौर यान 4.5 इंच जाडीचे असणार आहे. पृथ्वीवर सूर्याचे किरण जेवढ्या तीव्रतेचे येतात त्याच्या किमान 500 पट अधिक तीव्रतेच्या किरणांचा सामना या यानाला करावा लागणार आहे. ज्या भागात 10 लाख फॅरेनहाईटपर्यंत तापमान वाढू शकते, तेथेही या यानाचे तापमान केवळ 2,500 फॅरेनहाईटपर्यंतच वाढू शकेल. जर सगळे काही सुरळीत राहिले तर यानाच्या आतील तापमान केवळ 85 अंश फॅरेनहाईट राहू शकेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)