आततायीपणाचा झाडांच्या ‘मुळावर घाव’

शासन नियम पायदळी


पर्यावरणीय, आरोग्याच्या समस्या वाढल्या

पुणे : हिरवाईने नटणारे पुणे आता रखरखत्या उन्हाने तापत आहे. झाडे नसल्यामुळे हिरवाई कमी होत आहे. खरे तर, राज्य सरकारने कोटीच्या-कोटी वृक्षारोपण करत आपली पर्यावरणाशी असलेली बांधिलकीच अधोरेखित केली आहे. पण, ती जपताना शासनाकडूनच नियमांची पायमल्ली होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा दर 10 मीटर अंतरावर एक झाड असावे, असे शासनाचा नियम सांगतो, पण हाच नियम आपल्या अतेतायीपणामुळे धाब्यावर बसविण्याचा प्रकार महापालिकेकडून होत आहे.

 

नियमानुसार रस्त्याच्या दुतर्फा वनिकरण आवश्‍यक आहे. मात्र, जर काही वृक्षांमुळे विकासकामांना अडचणी येत असतील, तर त्यांची जवळच्या ठिकाणी पुनर्लागवड बंधनकारक आहे. क्‍वचित वेळा झाडे तोडण्याची परवानगी दिली जाते. मात्र, बहुसंख्य वेळा पुनर्लागवडीचा पर्याय उपलब्ध असतानाही झाडे सरसकटपणे तोडली जातात. यामुळे शहरातील झाडांची संख्या कमी होऊन परिणामी तापमान वाढ, प्रदूषण, भूजल पातळीत घट यांसारख्या समस्या उद्‌भवत आहेत. विशेष म्हणजे, वनिकरणाच्या या नियमाबाबत वृक्ष प्राधिकरण समितीच अनभिज्ञ आहे.
विनोद जैन, पर्यावरण अभ्यासक.

“महाराष्ट्र राज्य वृक्ष संरक्षण व संवर्धन कायद्या’अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वनिकरण आवश्‍यक आहे, असा निर्णय आहे. त्यानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दर 10 मीटर लांबीवर आणि रूंदीनुसार दर 12 मीटरवर एक झाड आवश्‍यक आहे. मात्र, सध्या हा नियम पूर्णत: डावलला जात आहे. शहरात दररोज लाखो जण प्रवास करतात. अशावेळी झाडे नसल्याने प्रदूषणासारख्या पर्यावरणीय समस्या तर त्वचेचे विकार, डोळ्यांची जळजळ अशा आरोग्याच्या समस्यादेखील झेलाव्या लागत आहे.

झाडे असावीत, असा शासन नियम आहे. मात्र, ती लावली जावीत असे कोठेही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्ते बांधताना महापालिका झाडांची लागवड करत नाही. अनेकदा महापालिकेकडून झाडांची जवळ्च्या ठिकाणी पुनर्लागवड केली जाते. मात्र यासंदर्भात मुख्य जबाबदारी वृक्ष प्राधिकरणाची आहे, असे महापालिकेच्या पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले.

रस्त्याच्या दुतर्फा झाडे असण्याचे फायदे :
रहदारी, प्राण्यांना सावली मिळते
रस्त्यांचे आयुर्मान वाढते.
वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत.
अपघात कमी होण्यास मदत.
झाडांपासून महसूल उत्पन्न.

जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली वृक्ष लागवडीची माहिती
राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी राव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यासाठी अजून जागा निश्‍चित केलेली नसल्यास येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण करुन याबाबतची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला सादर करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. यावेळी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, पुणे विभागाच्या उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी, रोहयो उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाणउपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)