आतकरी मळ्यात मृत बिबट्या आढळला

File photo

बेल्हे- सुलतानपूर (ता. जुन्नर) शिवारात आतकरी मळ्यात नवनाथ आतकरी यांच्या शेतात आज (दि. 11) दुपारी दोन वर्षे वयाचा मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या मृत बिबट्याची माहिती शेतकऱ्यांनी वन विभागास दिल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन वनकर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याचे धड विच्छेदनासाठी ताब्यात घेतले. बिबट्या मृत होण्याचे कारण समजू शकले नसल्याचे वनपाल भालेराव यांनी सांगितले. या परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासुन दोन छोटे-मोठे बिबटे दिसून येत होते, त्यामुळे मृत झालेला बिबट्या हा यातीलच एक असावा, असा अंदाज शेतकऱ्यांकडूनन व्यक्त करण्यात येत आहे. चारपैकी एक बिबट्या जर या ठिकाणी मृत झाला असेल तर इतर तीन बिबटे या ठिकाणी ठाण मांडून बसण्याची शक्‍यता असल्याने या ठिकाणी पिंजरा लावण्याची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)