आतकरवाडी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन

गराडे आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आतकरवाडी (ता. पुरंदर) येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी चिमुकल्याने विविध कलागुण सादर केले. या कलागुणांना आतकरवाडी, परिंचे, माहुर पालक, ग्रामस्थांनी 25 हजार रूपयांची रोख बक्षीस दिल्याची माहिती मुख्याध्यापक दत्तात्रय गोसावी यांनी दिली. या कार्यक्रमासाठी माजी आदर्श जि.प.सदस्य बबुसाहेब माहुरकर, सरपंच सुनंदा आतकरी उपसरपंच सुशिल चव्हाण, केंद्रप्रमुख राजेंद्र कुंजीर, सामाजिक कार्यकर्ते सचिन जगताप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत माहुकर, आदर्श शिक्षक अनंता जाधव, शरद कुंभार, तानाजी रिठे, संजय धुमाळ, दिपक जाधव, सिताराम गावडे, विजय वाघमोडे, प्रशांत बनकर तसेच माहुर केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, आतकरवाडी, माहुर व परिंचे गावातील पालक, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मोहन मुळे व सचिन परांडे यांनी केले. अपर्णा मदने यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)