आण्याची आमटी-भाकरी भाविकांपर्यंत पोहचणार लिफ्टने

आणे- आणे (ता. जुन्नर) येथे जानेवारीत असणाऱ्या श्री रंगदास महाराज स्वामी पुण्यतिथी शतकोत्तर सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त येथे बनवला जाणार महाप्रसाद आमटी-भाकरीचा असतो. हा महाप्रसाद श्री रंगदास स्वामी सांस्कृतिक भवनात दिला जातो. हे भवन दोन मजली असल्याने आमटी-भाकरीवरच्या मजल्यावर पोहचवण्यासाठी भाविकांच्या गर्दीमुळे अडचण येत होती. यावर्षी आमटी-भाकरी पोहोचवण्यासाठी लिफ्टचा वापर केला जाणार आहे. यासाठी एकूण 2 लाख 75 हजार रुपये खर्च झाला आहे. लिफ्ट बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून 10 ते 15 दिवसांत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती संजय दाते यांनी दिली. या सुविधेमुळे मनुष्यबळ आणि वेळ वाचणार आहे. या पूर्वी आमटी-भाकरी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर पोहोचवण्यासाठी मोटार पपंचा उपयोग करण्यात आला होता; परंतु हा प्रयोग अयशस्वी झाला. लिफ्ट बसवण्यासाठीचा सर्व खर्च संजय दाते, दत्तात्रय कांबळे, प्रभाकर आहेर, समीर कांबळे, बाबाजी आहेर, विजय आहेर, भास्कर दाते, एम. डी. दाते, बी. के. आहेर, पुणेकर मित्र मंडळ यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)