आण्णासाहेब कल्याणीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

सातारा,दि.6 (प्रतिनिधी)
येथील आण्णासाहेब कल्याणी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. तब्बल 18 वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिंनी जुन्या आठवणीमध्ये रमून गेले होते. सन 2000 च्या बॅचचे विद्यार्थी व सध्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 86 जणांनी यावेळी उपस्थिती दाखवली.

सातार्‍यातील एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्याला शालेय आठवणींची किनार होती. सर्वजण हॉलमध्ये येताच वाजलेली घंटा, अन् आत केलेली परीक्षेप्रमाणे बैठक व्यवस्था सर्वांना अचंबित करून टाकणारी होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विविध क्षेत्रातील मान्यवर असलेल्या या विद्यार्थ्यांनी आपले अधिकारपद विसरून यावेळी धम्माल केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)