आण्णाभाऊंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा

सातारा ः जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन देताना रिपाइंचे पदाधिकारी.

सातारा येथील दलित समाजाची निवेदनाद्वारे मागणी
सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) – पंढरपूर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर दगडफेक करुन पुतळा फोडण्याचे काम काही समाजकंटकांनी केल्यामुळे सातारा येथील दलित समाजाच्यावतीने निदर्शने करुन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदनाद्वारे आपला निषेध व्यक्‍त केला.
पंढरपूर येथील सांगोला चौकात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी दि. 9 रोजी दगड मारुन पुतळा फोडण्याचे काम केले आहे. खरे तर मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वच समाज एकत्र आला होता. त्यात मागासवर्गीय समाजानेही या आरक्षणाला पाठिंबा देवून त्यांच्याबरोबर दिवसभर होते. मग या पुतळ्यावर जातीय दंगलीवर नजर ठेवूनच काही समाजकंटकांनी दगडफेक करुन आण्णाभाऊंचा पुतळा फोडला आहे. एकतर एका बाजुला मराठा आरक्षणासाठी सर्व मराठा समाज एकत्र आला असताना त्यास वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला आहे. त्यामुळे या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करावी व त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन कडक शासन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासाठी पोलीस यंत्रणेने तात्काळ पावले उचलावीत अशी सातारा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्यावतीने निदर्शने करुन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन दिले.
या निवेदनावर किशोरभाऊ तपासे, अशोक गायकवाड (जिल्हाध्यक्ष रिपाइं (ए), आण्णा वायदंडे, वैभव गायकवाड (विद्यार्थी सेना, जिल्हाध्यक्ष), नितीन तुपे (उपाध्यक्ष, प. महाराष्ट्र मातंग आघाडी), फारुक पटणी (जिल्हाध्यक्ष मुस्लिम अल्पसंख्यांक आघाडी), सचिन वायदंडे (जिल्हा कार्याध्यक्ष युवक), अप्पा तुपे, अजिंक्‍य तपासे यांच्या सह्या आहेत.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)