आण्णाभाऊंची शाहिरी मनावर अधिराज्य गाजविणारी : आमदार गायकवाड

चिंचवड : राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या अभिवादन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ऍड. जयदेव गायकवाड.

पिंपरी – “पृथ्वी हि शेषाच्या नागावर उभी आहे असे म्हणले जायचे परंतु आण्णाभाऊ साठे यांनी पृथ्वी ही कष्टकरी, मजुरांच्या तळहातावर तरली आहे, असे सांगत आण्णाभाऊंच्या शाहीरी संयुक्त महाराष्ट्रासाठी सतत प्रेरणा देत राहिली. त्यामुळे 107 लोकांनी प्राणांची आहुती दिली लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी शाहिरी आहे, असे मत राष्ट्रवादीच्या सामाजिक व न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार ऍड. जयदेव गायकवाड यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवड शहर सामाजिक न्याय विभागाच्यावतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ऑटो क्‍लस्टर येथे जाहिर अभिवादन सभेत ते बोलत होते.

या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक नाना काटे, राजू बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, प्रज्ञा खानोलकर, गोरक्ष लोखंडे, अरूण बोऱ्हाडे, निलेश पांढारकर, सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष पंडीत कांबळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर आदी उपस्थित होते.

-Ads-

शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, दीड दिवसाची शाळा शिकून आण्णाभाऊंनी प्रेरणादायी साहित्य लिहले. आण्णाभाऊचे साहित्य, प्रेरणादायी तसेच संयुक्त महाराष्ट्रासाठी गायलेली शाहिरी आजही तितकीच प्रेरणादायी, रोमांचकारी सामाजिक सलोखा प्रस्थापित करणारी तसेच सतत ऐकावी असे वाटते, आण्णाभाऊ साठे यांचे विचार आता तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी नव्या पिढी समोर मांडणे गरजेचे आहे असे म्हणाले. तसेच आण्णाभाऊंच्या जयंतीदिनी मराठी दिन म्हणून साजरा करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

संयोजक सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचा आढावा सादर केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन सकाटे, अभिजीत भालेराव, संजय तुपे, सुर्यकांत पात्रे, शिवदास चिलवंत, समाधान मारकड, आकाश अंकुटे, योगेश आयवळे, गणेश शिंदे, अभिजीत गोपी, अभिजीत आल्हाट, शिवाजी सुरवसे, राजेंद्र शिंदे, हनुमंत प्रधान, धर्मा शिंदे, केरबा पात्रे, मारूती पात्रे, अमित गायकवाड, प्रविण बनसोडे, ऋषीकेश सोनवणे, बुध्दकोष निकाळजे, राम तुपे यांनी विशेष परिश्रम घेतले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)