आणेपठार येथे महाराष्ट्र बॅंकेचा ढिसाळ व्यवहार

बेल्हे – आणेपठार (ता. जुन्नर) भागातील दहा गावांच्या ग्रामस्थांना आणे येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतील ढिसाळ व्यवस्थापनामुळे सेवा मिळत नसल्याने, संताप व्यक्त होत आहे.
आणे पठार भागातील दहा गावच्या ग्रामस्थांसाठी अर्थ पुरवठा करणारी बॅंक ऑफ महाराष्ट्र ही एकमेव राष्ट्रीयकृत बॅंक शाखा असल्याने, तेथे परिसरातल्या ग्राहकांची रोजच गर्दी होते. या बॅंकेत गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सेवा मिळत नाहीत. बॅंक व्यवस्थापन उडवा-उडवीची उत्तरे देऊन ग्रामस्थांना सेवा देत नसल्याची तक्रार येथील व्यापारी राजेंद्र नांगरे यांनी केली.
आणे येथे, बॅंकेजवळ उपस्थित रंगदास स्वामी देवस्थान उपाध्यक्ष अनिल आहेर, बाळासाहेब थोरात, संजय पंडित, सचिन आहेर, राजेश दाते, सुनील दाते, मारुती शिंदे, अमोल शिंदे, राजू गांडाळ, बाळासाहेब नांगरे या ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची सेवा बॅंकेत मिळत नाही, बॅंकेत केलेल्या व्यवहाराची बॅंक खाते पुस्तकात नोंद करण्यासाठी ग्राहकांना हेलपाटे मारावे लागतात, बॅंकेचे व्यवस्थापक एलआयसीचा आयुर्विमा उतरविण्यासाठी ग्राहकांना आग्रह धरतात. मात्र, बॅंकेत पैसे काढण्यासाठी सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या गरजवंत ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने, बॅंकेच्या ढिसाळ व्यवस्थापनाबाबत नागरिकांत प्रचंड रोष आहे.

मी व्यावस्थापक आहे. बॅंकेत खाते पुस्तक छपाई मशीन बंद आहे. कर्मचारी अपुरे आहेत, त्यामुळे ग्राहकांना योग्य सुविधा मिळत नाही.
– सुदर्शन खडके, व्यवस्थापक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)