आणीबाणीच्या मुद्दयावर लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

आ.आनंदराव पाटील: 80 साली इंदिरा गांधींचेच सरकार आले होते
सातारा,दि.27 प्रतिनिधी- भाजपला निवडणुक काळात दिलेले एक ही आश्‍वासन पुर्ण करता आले नाही. त्यामुळे निवडणूका तोंडावर आल्यामुळे आणीबाणीचा मुद्दा त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, 1980 साली पुन्हा एकदा इंदिरा गांधींचेच सरकार आले होते हे विशेषत: युवकांनी लक्षात घेतले पाहिजे, असे आवाहन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केले.
जिल्हा कॉंग्रेस कमिटीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी रजनी पवार, साहेबराव जाधव, मोहनराव भोसले, बाळासाहेब बागवान, बाबासाहेब कदम, प्रल्हाद जाधव विजयराव कणसे, बाळासाहेब शिरसाट, जाकीर पठाण, दयानंद भोसले, राहूल घाडगे आदी.उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी योगदान दिले तर इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. भाजप सरकारचा असा कोणताही इतिहास नाही. उलट एकच खोटी गोष्ट दहा वेळा सांगून ती सत्य असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. आणीबाणीच्या मुद्दयावरून कॉंग्रेसची प्रतिमा व लोकांचे लक्ष विचलित करण्यात येत आहे. भाजप सरकारने 4 वर्षात कोणते आश्‍वासन पुर्ण केले हे जनतेला सांगावे. 4 वर्षाच्या कालावधीत त्यांनी इव्हेंटशिवाय काही एक केले नाही. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रूपये अद्याप जमा झाले नाहीत. हिटलरपेक्षा मोदी मोठे निघाले असून त्यापध्दतीने त्यांची वर्तणूक आहे. कॉंग्रेस सरकारच्या काळात 72 हजार रूपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. ह्या सरकारने राज्यात 34 हजार कोटींची कर्जमाफी देण्याची घोषणा केली मात्र, जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. एकूणच सरकारची शेतकऱ्यांना काही देण्याची इच्छा नाही असे धोरण स्पष्टपणे दिसून येत आहे.
विजयराव कणसे म्हणाले, युवक कॉंग्रेसच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अधिकाधिक युवकांना सदस्य करण्यासाठी प्रयत्न सर्वांनी केले पाहिजेत. ब्लॉब अध्यक्षांनी ही बुथ कमिट्यांच्या सदस्यांची यादी लवकरात लवकर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडे सादर करावी. तसेच विद्यमान सरकार कसे अपयशी ठरले आहे हे आपल्या गावातील दहा ज्येष्ठांना पारावर निमंत्रित करून सांगून जनजागृती करावी. लोकसभा व विधानसभा निवडणूका कधी ही लागू शकतात त्यासाठी प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सतर्क राहिले पाहिजे. तर युवकचे जिल्हाध्यक्ष राहूल घाडगे यांनी युवक कॉंग्रेस सदस्य नोंदणी व निवडणूकीच्या कार्यक्रमाची माहिती उपस्थितांना यावेळी दिली.

यापुढे आरोप प्रत्यारोप बंद
कार्याध्यक्ष विजयराव कणसे यांनी पक्षांगतर्गत कलहावर भाष्य करताना कार्यकर्त्यांना मागदर्शन केले. ते म्हणाले, यापुढे आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप बंद करण्यात येत आहेत. यापुर्वी जे काही झाले ते गैरसमजुतीतून झाले. आता आपआपसातले मतभेद दूर करून कॉंग्रेसला पुन्हा एकदा गतवैभव देण्यासाठी प्रयत्न करू या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युवकांशिवाय कॉंग्रेस भक्कम होणार नाही
युवक कॉंग्रेसच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अधिकाधिक युवकांना सभासद करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करताना आ.आनंदराव पाटील म्हणाले, भिलारे गुरूजी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तर मी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो. गुरूजींनी त्यावेळी मला वरिष्ठ व युवक कॉंग्रेसची बैठका एकत्रित आयोजित करू या असे सांगितले होते. अशा पध्दतीने बैठकांचे आयोजन केले तर बैठकीचा हॉल पुर्णपणे भरून जायचा असे सांगत युवकांशिवाय कॉंग्रेस भक्कम होवू शकणार नाही, असे आ.पाटील यांनी शेवटी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)