…..आणि सेरेना पंचाना म्हणाली ‘तुम्ही खोटारडे आणि चोर आहात!’

आपल्या प्रतिभेने आणि खिलाडुवृत्तीसाठी जगभरातील टेनिसप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या अमेरिकेची स्टार टेनिस क्वीन सेरेना विल्यम्ससाठी कालचा दिवस अतिशय वेदनादायी ठरला. प्रशिक्षकांकडून ऑन फिल्डवर सल्ले घेत असल्याचे आढळून आल्यानंतर तिला प्रथम शिस्तभंग कारवाईला सामोरे जावे लागले. त्यानंतर खवळलेल्या सेरेनाने पंचावर शाब्दिक आसूड ओढत खोटारडे आणि चोर अशा शब्दांचा वापर केला. अशा पद्धतीची भाषा वापरल्याने सेरेनाला पुन्हा पेनल्टीला सामोरे जावे लागले.

त्यामुळे तिला एकाच सामन्यात दोनवेळा शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने 23 वेळा ग्रॅंडस्लॅमवर नाव कोरणाऱ्या सेरेनाला 6-2, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामन्यातील नाओमीच्या झुंजार खेळाच्या प्रदर्शनाहून सेरेनाला झालेल्या दंडाने आणि तिला कोसळलेल्या रडूने हा सामना कायम स्मरणात राहिलं.

दुसऱ्या सेटमधील खेळ सुरू असताना भर मैदानावर सेरेना आणि पंचामध्ये वाद विवाद झाला. तिने पंचांवर खोटारडे आणि चोर असे शाब्दिक आसूढ ओढल्यानंतर वादाला सुरवात झाली. त्यानंतर तिने सामना निरीक्षक आणि सामनाधिकाऱ्यांशी सुध्दा हुज्जत घातली. या सर्व प्रकारानंतर सेरेनाला कोर्टवरच रडू कोसळले. त्यांनी माझ्यावर फसवणुकीचा आरोप केला पण मी फसवणुक करत नव्हते असे तिने सामन्यानंतर बोलताना सांगितले. मी ऑन कोर्टवर प्रशिक्षण घेत नाही असेही तिने नमूद केले. जरी सेरेनाने प्रशिक्षण घेत नसल्याचा दावा केला असला, तरी प्रशिक्षक पॅट्रीक मौरातोगलोवू यांनी तसे केल्याचे मान्य केल्यामुळे वादावर पडदा पडण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)