…आणि राखीला झाली मिका सिंगची आठवण

मुंबई :अभिनेत्री राखी सावंत लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. सध्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये राखी व्यस्त आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये किसिंग सीन करताना तिला त्रास झाल्याची माहिती राखीने एका मुलाखतीत सांगितले. या सीनसाठी राखीला सुमारे 55 रिटेक्स द्यावे लागले.
“अशाप्रकारचे काम यापूर्वी केलेले नाही. किसिंग सीनसाठी मद्यपान करावे लागल्याचे राखीने म्हटले. चित्रपटापूर्वी किसिंग सीनबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. पण हा सीन टाळणंही शक्य नव्हते अशी माहिती राखीने दिली आहे. आयत्यावेळेस किसिंग सीन सांगितल्याने त्याचा परफेक्ट टेक मिळत नव्हता. पण या सीनच्या वेळेस राखीला मीका सिंगसोबत झालेल्या ‘किसिंग सीन’ ची सतत आठवण येत होती. ” मला  या सीनच्या वेळेस भीती वाटत होती. माझा कोणीतरी वापर करत आहे. माझ्यावर दबाव आहे. चित्रपटाच्या भागाऐवजी ‘ही’ गोष्ट पुन्हा माझ्यासोबत घडत असल्यासारखं वाटतं होतं.” अशी माहिती राखीने दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)