…आणि पवारांनी तंबाखू सोडली

माढ्यात रंगल्या खासदार मोहिते पाटीलांच्या मोकळ्या गप्पा

रेडा – बारामती प्रमाणेच माढ्यातही पास पोर्ट कार्यालय शरद पवार याच्या मार्फत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य यांच्याकडे पाठपुरावा करुन मंजुर करुन घेतले आहे. आता, हे कार्यालय सुरु होईल, यामुळे बारामती प्रमाणेच माढ्याच्या बाजारपेठेला चालना मिळेल तसेच हॉटेल चांगली चालतील. खाण्या पिण्याची चांगली सोय येथे होईल, त्यातून उत्पन्न वाढेल. खाण्या पिण्याचं काम करावं… असे म्हणत, तंबाखु खायचं बंद करावं…, मी तंबाखु खात होतो…आमदार शिंदे पण खात होते. त्यांनी सोडली म्हणून मी ही सोडली आणि आता शरद पवार साहेबांनीही सोडली…, असे खासदार विजयसिंह मोहिते पाटील म्हणताच उपस्थितांत टाळ्या कडाडल्या.

माढ्यातील पोस्ट कार्यालयात आधार कार्ड नोंदणी व आधार कार्ड लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त खासदार विजयसिंह मोहिते पाटील आज (दि.22) माढ्यात आले होते. यावेळी त्यांनी बारामतीचा उल्लेख करीत पवार यांच्याबद्दलचा हा किस्सा ऐकवला.

या कार्यक्रमास माढ्याचे आमदार बबनराव शिंदे देखील उपस्थित होते. माढा लोकसभा मतदार संघाच्या प्रचारसभेनंतर हे दोन्ही दादा प्रथमच माढ्यात एका व्यासपीठावर आले होते. पोस्ट कार्यालयाच्या कार्यक्रमात खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी मनमोकळेपणाने मनोगत व्यक्त केले. आणि त्याची चर्चा सर्वत्र झाली. ते म्हणाले की, आधार कार्ड ही सध्या माणसांची ओळख बनली आहे. पोस्ट कार्यालया मार्फत आधार नोंदणी करण्याची चांगली सोय झाली आहे. या कार्यक्रमाला माजी आमदार विनायक पाटील, प्रांताधिकारी मारुती बोरकर, तहसिलदार एम.पी.मोरे, माढ्याचे नगराध्यक्ष गंगाराम पवार, माजी जि.प.सदस्य आनंदराव कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)