….आणि जॅकीदादा झाला इमोशनल

बॉलिवूडचा स्मार्ट हिरो अर्थात जॅकी श्रॉफ यांची साधी राहणी ही बॉलीवूडसह सर्वांनाच माहिती आहे. त्यात ते बॉलीवूडमध्ये आपले नाव कमावण्याच्या अगोदर मुंबईतील एका चाळीत राहात होते. काही दिवसांपूर्वी जॅकी श्रॉफ त्यांच्या तीन बत्ती येथील जुन्या घराला पाहून भावूक झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये  जॅकीने आपले जुने घर घेण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जॅकी अभिनेता अरजन बाजवासोबत गाडीतून फिरताना दिसतो. जॅकी स्वतः गाडी चालवत आहे. व्हिडिओमध्ये जॅकी त्याच्या जुन्या दिवसांबद्दल अरजनला सांगताना दिसतो. हा व्हिडिओ अरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबतच त्याने अजून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओला कॅप्शन देताना अरजन म्हणाला की, मी जॅकीसोबत कुलाबा येथील एका रेस्तराँमधून जेवण करुन निघत होतो. तेव्हा जॅकीने गाडी त्याच्या जुन्या घराच्या दिशेने वळवली. वाळकेश्वर येथे त्याने आयुष्यातील ३० वर्ष घालवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)