…आणि करिष्माने बॉयफ्रेंडसोबत पार्टीत केली एन्ट्री !

मुंबई : 15 फेब्रुवारी रोजी अभिनेते रणधीर कपूर यांचा वाढदिवस कपूर खानदानाने मोठ्या धुमधडाक्‍यात साजरा केला. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंबिय उपस्थित होते. या गर्दीत एक चेहरा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता… तो म्हणजे करिश्‍माचा बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवाल… गेल्या काही दिवसांपासून करिष्मा आणि संदीपच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू आहे.
आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला करिष्मा संदीपला सोबत घेऊनच पार्टीत दाखल झाली होती. यावरून हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकू शकतात, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोत रणधीर आणि बबितासोबत करिश्‍मा आणि संदीप दिसत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, करिष्मा हिने पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतला आहे. तिला संजयसोबत दोन मुले आहेत. तर संदीप त्याच्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्याच्या प्रयत्नात आहे. पत्नी सायकोलॉजिकल डिसऑर्डरनं पीडित असल्याचे त्याने आपल्या घटस्फोटाच्या अर्जात म्हटले आहे. एका फार्मास्यूटीकल्स कंपनीत सीईओ असलेल्या 11 वर्षांची आणि 6 वर्षांची दोन मुली आहेत. रणधीर कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला सैफ अली खान, करिना कपूर, मलाइका अरोडा, अमृता अरोडा, ऋषी कपूर, नीतू कपूर, रेखा, अमिताभ बच्चन हेदेखील सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)