आणखी 700 जुन्या बस धावणार रस्त्यावर?

देवतोरणे – येथे महिलांचे आरोग्य कायम टिकून राहावे यासाठी 14 वा वेतन आयोग निधीअंतर्गत देवतोरणे येथे सर्व गटांतील सर्व महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महिलांच्या दररोजच्या, तसेच काही विशिष्ट वयानंतर उद्‌भवणाऱ्या समस्यांची तपशीलवार माहिती, पाणी, स्वच्छता आदींबाबत पुणे शिक्षण विभागाच्या उज्ज्वला शिर्के यांनी दिली. मासिक पाळीतील समस्या आणि त्यासंदर्भात घ्यायची काळजी व उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले. खेड पंचायत समिती स्वच्छ भारत विभागाच्या समन्वयक लतिका भालेराव यांनी मुलींना हात धुण्याच्या पद्धतींबाबत प्रत्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. या आरोग्य शिबिरासाठी सरपंच उषा आवारी, ग्रामसेवक बी. एन. वीर, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि महिला वर्गाने मोलाचे सहकार्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)