आणखी 7 देवस्थानांना “क’ दर्जा

जिल्हा नियोजन समिती बैठकीत निर्णय : संख्या 104 इतकी

पुणे – जिल्ह्यातील आणखीन 7 देवस्थानला “क’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला असून, ही संख्या 104 इतकी झाली आहे. तसेच तिर्थक्षेत्रांसाठी स्वतंत्र निधी येत असल्यामुळे देवस्थान परिसराचा विकास होणार आहे. त्यामध्ये दौंड तालुक्‍यातील तीन, पुरंदर तालुक्‍यातील दोन तर बारामती आणि खेड तालुक्‍यांतील प्रत्येकी एका देवस्थानचा समावेश आहे.

-Ads-

जिल्ह्यात “क’ वर्गाचे एकूण 97 देवस्थानांची नोंद आहे. देवस्थान ही गावाची एक वेगळी ओळख असते. यात्रा, उत्सव या काळांत गावाला महसूल मिळण्यास मदत होते, गावाचे नाव जिल्हा, राज्य पातळीवर पोहोचत असते. त्यामुळे दरवर्षी “क’ वर्गाच्या तिर्थक्षेत्रांना विविध विकासकामे आणि मंदिराच्या स्वच्छतेसाठी निधी दिला जातो. दरम्यान, तिर्थक्षेत्रांना मिळणाऱ्या निधीतून स्वच्छता आणि प्राथमिक सुविधांवर अधिक भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत दिल्या. त्यानुसार विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून तिर्थक्षेत्राचा विकास केला जात आहे. नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बारामती तालुक्‍यातील श्री क्षेत्र ढगाईदेवी देवस्थान (होळ), दौंड तालुक्‍यातील देलवडी खंडोबा देवस्थान, भानोबा देवस्थान (कुसेगाव), नागेश्‍वर देवस्थान (पाटस), खेड तालुक्‍यातील खंडोबा देवस्थान (कडधे) आणि पुरंदर तालुक्‍यातील पांडेश्‍वर मंदिर (जेजूरी), श्री क्षेत्र कोळविहीरे येथील डोंगरची आई या देवस्थानला “क’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला, अशी माहिती जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यांनी दिली.

“क’ दर्जा असलेली देवस्थाने
“क’ वर्गाच्या देवस्थानांचा दर्जा मिळवण्यासाठी त्या देवस्थानला वर्षाला किमान 1 लाख भाविकांनी भेटी दिल्या पाहिजेत. त्याबाबतचा पोलीस अधिक्षकांचा दाखला असणे आवश्‍यक आहे. तसेच ग्रामपंचायत आणि आवश्‍यक ते पत्र असणे आवश्‍यक आहे. त्यानुसार जुन्नर येथे सर्वाधिक 12 देवस्थानांची संख्या आहे. त्यापाठोपाठ इंदापूर येथे 10, खेड येथे 11, दौंड येथे 7 असून, आणखीन तीन देवस्थानांना “क’ दर्जा मिळाल्यामुळे येथील संख्या 10 झाली आहे. तसेच शिरूर, आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, मावळ, मुळशी, पुरंदर आणि वेल्हा असे मिळून 104 देवस्थाने “क’ दर्जाचे तीर्थक्षेत्र आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)