आणखी 33 “तेजस्विनी’ महिनाभरात

पीएमपी प्रशासनाची महिलांसाठी खास सेवा

पुणे – गतवर्षी महिलादिनाचे औचित्य साधत खास महिलांसाठी सुरू केलेल्या “तेजस्विनी’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्यस्थितीत महिलांसाठी शहरात 30 बसेसच्या माध्यमातून सेवा देण्यात येत असून इतर मार्गांवरही मागणी वाढत आहे. यातच येत्या महिन्याभरात नव्या 33 तेजस्विनी बसेस शहरात दाखल होणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“तेजस्विनी’ बसेसला महिलांचा अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सध्या एकूण 9 मार्गांवर 30 बसेसमार्फत “तेजस्विनी’ची सेवा दिली जात आहे. या मार्गांवर दररोज 200 पेक्षा जास्त फेऱ्या होत आहेत. यातच पीएमपी प्रशासनाने “तेजस्विनी’ची सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध करुन दिल्याने फायदा होत आहे. त्यामुळे शहराच्या इतर भागातून मागणी वाढत आहे. मात्र, सद्यस्थितीत बसेसची संख्या कमी असल्याने बसेस उपलब्ध करुन दिल्या जात नव्हत्या. मात्र, येत्या महिनाभरात शहरात टाटा कंपनीच्या नव्या 33 “तेजस्विनी’ मिडीबसेस दाखल होणार आहेत. या बसेस आल्यानंतर मागणी असलेल्या ठिकाणी जादा बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

खास पथकाचीही नेमणूक
“तेजस्विनी’ बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी असल्याने बसेस तुडूंब भरतात. अशा परिस्थितीचा काही महिलांकडून फायदा घेण्यात येत असून विनातिकीट प्रवास केला जात असल्याचे समोर आले. या पार्श्‍वभूमीवर “तेजस्विनी’मध्ये दामिनी पथकाची स्थापना केली आहे. या माध्यमातून फुकट्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

….नव्या बसेसचा रंग आकर्षक
शासन निधीतून या विशेष “तेजस्विनी’ बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र, त्या वेळेत उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत. यामुळे तात्पुरत्या स्वरुपात आहे त्या मिडीबसमधीलच बसेस “तेजस्विनी’ म्हणून सुरू आहेत. मात्र, शासन निधीतून देण्यात येणाऱ्या या बसेस महिनाभरात उपलब्ध होणार असून त्या “ऑरेंज’ रंगाच्या असतील, अशी माहिती प्रशासनातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

येत्या महिनाभरात नव्या 33 तेजस्विनी बसेस दाखल होणे अपेक्षित आहे. यासाठी आवश्‍यक ती सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे. नव्या बसेस उपलब्ध झाल्यानंतर ज्या ठिकाणी तेजस्विनी बसेसची मागणी आहे. अशा ठिकाणी बसेस वाढवण्यात येतील.
– नयना गुंडे, अध्यक्षा तथा व्यवस्थापकिय संचालक, पीएमपी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)