आणखी 305 व्यक्‍ती स्वाइन फ्लू संशयित

मागील आठ दिवसांत 19 हजार जणांची तपासणी

पुणे – शहरात मागील आठ दिवसांत 19 हजार व्यक्तींची स्वाइन फ्लू तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 305 व्यक्ती संशयित आढळले. त्यांना टॅमीफ्लूची औषधे देऊन घरी सोडण्यात आले.

-Ads-

उन्हाचा कडाका वाढल्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पंधरा दिवसांपासून स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या केवळ दोन आहे. तर, उपचार घेणाऱ्यांची संख्या 25 वरून 4 वर आली आहे. दरम्यान, प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही ढगाळ वातावरणामुळे फ्लू पुन्हा वाढण्याची शक्‍यता आहे.

शहरात 1 जानेवारी 2018 पासून आतापर्यंत तब्बल 8 लाख 58 हजार 606 व्यक्तींची स्वाइन फ्लू तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 582 जणांना लागण झाली आहे. त्यामध्ये काही रूग्णांना प्राणही गमवावे लागले आहे. तर 16 हजार 190 व्यक्ती संशयित म्हणून आढळून आले आहेत. सध्या शहरातील विविध रुग्णालयांतील अतिदक्षता विभागामध्ये 7 जण उपचार घेत असून, 4 रुग्णांवर वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)