आणखी वाहने ठेवायची कुठे? प्रशासनापुढे प्रश्‍न

‘टो’ करून आणलेल्या गाड्या नदीपात्रात पडून

पुणे – रस्त्यात अडथळा ठरणारी टो करून आणलेली वाहने अजूनही नदीपात्रात पडून आहेत. येथील पार्किंग फुल्ल झाल्याने आता आणखी वाहने कुठे ठेवायची हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेक वाहनचालकांनी वाहनेच नेली नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेने एकत्रीतच रस्त्यावर पार्क केलेली वाहने उचलण्याची मोहीम सुरू केली आहे. ही वाहने रात्रीच्या वेळी उचलली जातात. ती उचलण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना वाहन आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबदल्यात या कारवाईतून जमा झालेल्या दंडातील निम्मी रक्‍कम महापालिकेला द्यावी लागणार आहे.

महापालिका कायद्यानुसार अशा वाहनांचा दंड हा हजारांमध्ये आहे. दुचाकींना पाच हजार, तीन चाकींना दहा हजार तर, चार चाकींना तब्बल पंधरा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

24 तासांपेक्षा जास्त काळ रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर ही कारवाई केली जात आहे. कारवाईतून शेकडो गाड्या पोलिसांनी उचलल्या आहेत. त्यातील दुचाकी वाहने टेम्पोमधून तर तीन चाकी वाहने “टो’ लावून भिडेपूलाजवळ नदीपात्रात आणली आहेत.

मात्र, आणलेल्या गाड्यांमध्ये काही गाड्या बिनधनीही आहेत. त्यांचा मालक शोधणेही आवश्‍यक आहे. त्यातील काही गाड्या चोरीच्या किंवा कोणत्या गुन्ह्यात वापरण्यात आल्या आहेत का? हे तपासणेही आवश्‍यक आहे. त्यामुळे ती लिस्ट पोलीस आणि आरटीओकडेही पाठवण्यात आली आहे.

…तर वाहनांचा होणार लिलाव
महापालिकेच्या नियमानुसार ठराविकच दिवस या गाड्या ताब्यात ठेवण्यात येणार असून, त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने त्याचा लिलाव केला जाणार असल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)