आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेतल्यानंतर केंद्राचे पथक येणार- अजित पवार

संग्रहित छायाचित्र...

अजित पवार यांचा संतप्त सवाल : 21 हजार गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई 

मुंबई: महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना फडणवीस सरकार केंद्रांचे पथक येण्याची वाट पाहात आहे. परंतु या सरकारची इच्छाशक्ती असती तर विमानानेही पथकाला आणता आले असते. मग हे सरकार कुणाची वाट बघतेय…आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेतल्यावर केंद्राचे पथक येणार आहे, असा संतप्त सवाल करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज सरकारवर टिकेची झोड उठवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अजित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दुष्काळावरून राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित होते. राज्यात आज 1972 मध्ये पडलेल्या दुष्काळापेक्षाही वाईट स्थिती बनली असताना सरकारकडून अजूनही दुष्काळ जाहीर केला जात नाही. राज्यात 21 हजार गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आकड्यांची जगलरी करत असून त्यांनी ते थांबवावे, अशी मागणी पवार यांनी केली.

राज्यातील शेतकऱ्यांची खरीप पिकेही गेली असून रब्बीची पिके येणार नाहीत अशी स्थिती आहे. अशात केंद्र सरकारचे पथक येणार कधी येणार आहे, त्यांना कोणी अडवले, असा सवाल करत या पथकाची वाट कशाला पाहता, त्यांना विशेष विमानाने घेऊन या असा सल्लाही अजित पवार यांनी सरकारला दिला.

राज्यात सरकारने साडेसात हजार कोटी रूपये खर्चून जलयुक्त शिवार योजना आणली आणि त्याचा मोठा गाजावाजा केला. परंतु आज जीएसडीएच्या अहवालात राज्यातील पाण्याची पातळी ही एक ते दीड मीटरने खाली गेल्याचे म्हटले असल्याने राज्यात आता दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. मागील वर्षी दुष्काळ जाहीर करताना राज्य सरकारने केंद्राकडे 3 हजार कोटीची मागणी केली. त्यापैकी एक रुपयाही राज्य सरकारला अद्याप प्राप्त झाला नाही.

कोट्यावधी खर्चुनही भूजल पातळी घटली 

राज्य सरकारने साडेसात हजार कोटी रुपये खर्च केले. मात्र तरी देखील भूजल पातळी कमी झाली असल्याचे जीएसडीएने म्हटले आहे. धरणाची परिस्थिती वाईट असल्याने पुढील 8 महिन्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्‍यक असून जनजागृती गरजेची आहे. मात्र सरकार राज्याच्या एकंदरीत परिस्थितीवर गांभीर्याने दिसत नाही. राज्य सरकारने जलयुक्त शिवारसाठी केलेल्या खर्चही हिशोब द्यावा, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)