आणखी काही दिवस संततधार

पुणे: राज्यात पावसाची सुरु झालेली संततधार अजून काही दिवस कायम राहणार आहे. आगामी दोन ते तीन दिवस राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. गणेशोत्सवाच्या आगमनाबरोबर राज्यात पावसाने सुध्दा हजेरी लावली ती अद्याप कायम आहे. कोकण-गोव्यासह संपुर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडला. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे. याशिवाय घाट माथ्यावर सुध्दा अनेक भागात चांगला पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्यो अंदाजानुसार येत्या 48 तासात राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडणार आहे.पुण्यातही आगामी काळात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)