आणखी एक बॅंक घोटाळा उघडकीस

कनिष्क गोल्डकडून 14 बॅंकांची 824.15 कोटींची फसवणूक
चेन्नई – पंजाब नॅशनल बॅंकेतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच आणखी एक बॅंक घोटाळा उघडकीस आल्याने बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कनिष्क गोल्ड प्रायव्हेट लिमिटेडद्वारा देशातील 14 बॅंकांची 824.15 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यात सर्वाधिक फटका हा स्टेट बॅंक ऑफ इंडियाला बसला असून त्यांनी सीबीआयकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कनिष्कचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे असून भूपेश कुमार जैन व त्याची पत्नी नीता जैन हे प्रवर्तक व संचालक आहेत. हे दोघेही मॉरिशसला पळून गेले असल्याचा संशय असून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे स्टेट बॅंकेने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी अद्याप सीबीआयने एफआयआर नोंद केलेली नाही.

कनिष्क गोल्डच्या संचालकांनी लेखापरीक्षकांशी संगनमत करून बॅंकांना फसवण्याच्या उद्देशानेच घोटाळा केल्याचा आरोप एसबीआयने केला आहे. कंपनीच्या आर्थिक स्थितीसंदर्भात दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. विविध बॅंकांचे 824 कोटी रुपयांचे कर्ज असून व्याजासह 1 हजार कोटींहून अधिकचा फटका बॅंकांना बसला आहे.

एसबीआयच्या तक्रारीनुसार कनिष्क गोल्डला 2007 नंतर कर्ज देण्यात आले. त्यानंतर कनिष्कने खेळत्या भांडवलाची मुदत वाढवून घेतली. 2011 मध्ये अनेक बॅंका कर्जासाठी पुढे आल्या ज्यामध्ये पंजाब नॅशनल बॅंक व बॅंक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. 2012 मध्ये एसबीआयच्या नेतृत्वाखालील बॅंकांच्या समूहाने मेटल ग्रॅंट लोनची सुविधा कनिष्कला दिली.

त्यानंतर कनिष्कची कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली. एसबीआय बॅंकेने 215 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बॅंकेने 115 कोटी, बॅंक ऑफ इंडियाने 45 कोटी, आयडीबीआयने 45 कोटी, युको बॅंकेने 40 कोटी असे विविध बॅंकांनी कनिष्कला कर्जे दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)