आणखी एक दाक्षिणात्य हिरो घेणार राजकारणात उडी

कन्नड अभिनेता उपेंद्रचा राजकीय पक्ष स्थापण्याचा मानस

बंगळूर -कन्नड चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता उपेंद्र याने नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे. त्यामुळे आणखी एक दाक्षिणात्य हिरो राजकारणात उडी घेण्यास सज्ज झाला आहे. उपेंद्रच्या पक्षामुळे पुढील वर्षीच्या प्रारंभी विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या कर्नाटकमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री राजकारणात सक्रिय होण्याची दाक्षिणात्य राज्यांमध्ये मोठी परंपरा आहे. त्यातील अनेकांनी राजकारणात स्वत:चा दबदबाही निर्माण केला. या परंपरेत आता 48 वर्षीय उपेंद्रची भर पडणार आहे. कर्नाटकमधील राजकारण प्रामुख्याने कॉंग्रेस, भाजप आणि जेडीएस या पक्षांभोवती फिरते. आता त्या राज्याच्या राजकारणातील चौथा कोन उपेंद्रचा पक्ष बनणार का, याबाबत मोठी उत्सुकता आहे.

याआधी उपेंद्र भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र, त्या चर्चांवर फुली मारत उपेंद्र स्वत:च राजकीय पक्ष स्थापण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, नव्या पक्षाची मुहूर्तमेढ केव्हा करणार याची माहिती त्याने जाहीर केलेले नाही. उपेंद्रने आतापर्यंत सुमारे 50 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्याने 10 चित्रपटही दिग्दर्शित केले. चाहते त्याचा उल्लेख रिअल स्टार म्हणून करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)