आणखी एक गुन्हेगार तडीपार

पिंपरी – पिंपरी पोलीस ठाण्यातील आणखी एका सराईत गुन्हेगारावर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

कृष्णा उर्फ दाद्या गणेश भोसले (वय-19, रा. नाल्याजवळ, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नावे आहे. यापूर्वी विशाल बबन गायकवाड याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

कृष्णा याच्यावर घरफोडी, चोरी, घातक हत्याराने दुखापत करणे, धमकी, दुखापत, दरोड्याची तयारी, खून यांसारखे गुन्हे दाखल आहेत. यावरून त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या परिमंडळ एक मधून 15 ऑगस्ट ते 20 नोव्हेंबर या कालावधीमध्ये निगडी पोलीस ठाण्यातील एक, पिंपरी पोलीस ठाण्यातील पाच, चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील तीन, दिघी पोलीस ठाण्यातील एक अशा एकूण 12 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)