आणखी एका स्टार किड्‌सची बॉलीवूडमध्ये होणार एन्ट्री

बॉलिवूडमधील जान्हवी कपूर, सारा अली खान, वरुण धवन, आलिया भट, अनन्या पांडे या स्टार किडच्या यादीत आणखी एकाची भर पडली आहे. आता प्रसिद्ध अभिनेता परेश रावल यांचा मुलगाही बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार आहे. दिग्दर्शक रंजन चंदेला यांच्या आगामी चित्रपटामध्ये परेश यांचा मुलगा आदित्य रावल हा लवकरच झळकणार आहे.

आपल्या वडीलांप्रमाणे आदित्यने अभिनयाचे धडे गिरवले असून तो रंजन चंदेला यांच्या “बमफाड’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे सुरु असून त्याच्याबरोबर अभिनेत्री सना अमीन शेख स्क्रिन शेअर करणार आहे.

यापूर्वी सना शेखने “सिंघम’, “टेबल नंबर 21′ या चित्रपटात काम केलेले आहे. दरम्यान, आतापर्यंत कानपूरमधील डी.एव्ही कॉलेज, मॉल रोडवरील रीटा हॉटेल आणि फुलबाजार येथे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. कानपूर येथे एक महिना चित्रिकरण करण्यात येणार आहे. अभिनयापूर्वी आदित्यने अमेरिकेत स्क्रिन रायटर म्हणून काम पाहिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)