आणखी एका सेलिब्रिटी वेडिंगची तयारी

काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या बातम्या सिनेमॅगझीनवरून वाहात होत्या. त्यांच्या रिसेप्शनच्या बातम्या संपत आहेत तोपर्यंत लगेचच प्रियांका आणि निक जोनासच्या विवाहाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान या रॉयल वेडिंगचा सोहळा चालणार आहे. त्यासाठी जोधपूरचा रॉयल उम्मेद पॅलेस सजून सज्ज झाला आहे. आता विवाहापूर्वीच्या पूजा आणि मेंदीच्या कार्यक्रमही झाले आहेत.

रणवीर आणि दीपिकाने दोनवेळा विवाहाचे विधी केले होते. पहिल्यांदा कोंकणी पद्धतीने आणि नंतर सिंधी पद्धतीने ते विवाहबद्ध झाले होते. त्याचप्रमाणे प्रियांका आणि निकचे लग्नही दोनवेळा होणार आहे. पहिल्यांदा हिंदू पद्धतीने आणि नंतर ख्रिश्‍चन पद्धतीने त्यांचे लग्न होणार आहे. या सोहळ्यासाठी ढिगभर विदेशी पाहुण्यांचे जोधपूरमध्ये आगमन झाले आहे. निक जोनासचा भाऊ जो जोनास आणि त्याची गर्लफ्रेंड सोफी टर्नर भारतात आले आहेत. गंमत म्हणजे बॉलिवूडच्या कोणत्याही अॅक्‍टरला या विवाह समारंभाचे निमंत्रण दिले गेलेले नाही. प्रियांकाने बॉलिवूडव्यतिरिक्‍त हॉलिवूडमध्येही काम केले होते.

हॉलिवूडच्या ड्‌वेन जॉनसन उर्फ द रॉक या एकाच अॅक्‍टरला निमंत्रित करण्यात आले आहे. ड्‌वेन जॉनसन ह्या प्रियांकाबरोबर “बेवॉच’मध्ये होता, तर निक जोनासबरोबर “जुमांजी’मध्येही तो असणार आहे. तो दोघांचाही कॉमन फ्रेंड असणार आहे. ड्‌वेन जॉनसन सारखा हॉलिवूड अॅक्‍टर विवाहाला येणार म्हणून प्रियांकाने त्याच्यासाठी खास हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आहे. लग्न जोधपूरला असेल तर प्रियांका आणि निकचा मुक्काम उद्‌यपूरला असेल. उदयपूरपासून जोधपूरला जाण्याची व्यवस्थाही हेलिकॉप्टरद्वारेच होणार आहे.

या विवाहाला येणाऱ्या सर्व पाहुण्यांना प्रियांका आणि निककडून “रिटर्न गिफ्ट’ म्हणून एक चांदीचे नाणे भेट दिले जाणार आहे. या नाण्याच्या एका बाजूला प्रियांका आणि निकच्या नावाची अद्याक्षरे आणि दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीच्या प्रतिमा असणार आहेत. या सगळ्या समारंभाचे रिपोर्टिंग करायला देशातील आणि विदेशातील पत्रकारांनी आगोदरपासूनच जोधपूरमध्ये मुक्काम ठोकला आहे. या लग्नाला यायचं हं !


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)