आणखी एका दहशतवाद्याला बंगळूरमध्ये अटक

बंगळूर – जमात-उल्‌-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) या दहशतवादी संघटनेच्या आणखी एका सदस्याला बंगळूरमध्ये अटक करण्यात आली. आदिल उर्फ असदुल्ला (वय 29) असे त्याचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जेएमबीचा म्होरक्‍या मोहम्मद जहीदूल इस्लाम याला अटक केली. त्यापाठोपाठ असदुल्ला याला पकडण्यात आले. त्याच्याकडून तीन मोबाईल फोन, बॅंक पेईंग स्लिप्स आणि स्फोटके बनवण्यासाठी आवश्‍यक रासायनिक सुत्रांची माहिती असणारे कागद जप्त करण्यात आले. बोधगया स्फोट प्रकरणी त्याला अटक करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता त्याला पुढील चौकशीसाठी पाटण्याला नेण्यात येईल. बोधगया स्फोट प्रकरणी एनआयएने आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. जहीदूल इस्लाम त्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या अटकसत्रामुळे जेएमबीला मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे. त्या संघटनेने बांगलादेशमधील लोकनियुक्त सरकार उलथवून टाकण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)