आढळला स्वाईन फ्लूचा आणखी एक रुग्ण

एक अत्यवस्थ : सात महिन्यांत 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.7 – शहरात स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत असून सध्या तीन रुग्ण रुग्णालयात स्वाईन फ्लूचा उपचार घेत आहेत. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत सात महिने व आठ दिवसांत शहरातील 19 जणांची एन-वन एच-वनची चाचणी सकारात्मक आली आहे. त्यातील 15 जणांना उपचारांती घरी सोडले आहेत तर तीन रुग्ण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत.
स्वाईन फ्लूबाबत सध्या एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे; तर अन्य दोन रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. 7 जुलै रोजी शहरात 2 हजार 530 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 18 जणांना टॅमी फ्लू देण्यात आली आहे. तर, एका रुग्णाला त्याची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अन्य पाच जणांचे तपासणी सध्या सुरू आहे. यंदाच्या वर्षी स्वाईन फ्लूने कोणीही दगावल्याचे वृत्त नसले तरीही मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. तसेच अनेक रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूचे लक्षण आढळल्याने त्यांची तपासणी सुरू आहे.
जानेवारीपासून ते 7 ऑगस्टपर्यंत सात महिन्यांत 5 लाख 18 हजार 852 रुग्णांची तपासणी झाली असून त्यापैकी 4 हजार 941 रुग्णांना टॅमी फ्लू देण्यात आले आहे. यातील 19 जणांची चाचणी सकारात्मक आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वाईन फ्लूची लक्षणे
ताप येणे, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, सर्दी, डोकेदुखी, नाक वाहणे आणि श्‍वास घेताना त्रास होणे. अतिसार व उलट्या होणे, दोन दिवसांहून अधिक काळ ताप असणे, शुद्ध हरपणे किंवा धाप लागणे आदी स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)