आडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञानातून शेती बनवू किफायतशीर (भाग २ )

आडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञानातून शेती बनवू किफायतशीर (भाग १ )

* जमीन व्यवस्थापन तंत्रज्ञान:
ऊस पिकासाठीपाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम पोताची आणि योग्य जलधारण शक्ती असणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5, क्षारांचे प्रमाण 0.5 % पेक्षा कमी, चुनखडीचे प्रमाण 12 % पेक्षा कमी व उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण भरपूर असावे.

-Ads-

* पूर्व मशागत : जमिनीची आडवी उभी खोल नांगरट करावी. शिफारशीनुसार आडसाली ऊस पिकास चांगले कुजलेले शेणखत 12 टन (25 बैलगाड्या) किंवा पाचटाचे कंपोष्ट खत 3 टन किंवा 1 टन प्रेसमड केक आणि 2 टन प्रति एकर गांडूळ खत ऊस लागवडीपूर्वी दुसऱ्या नांगरटिच्या वेळी अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्र सरी सोडण्यापुर्वी द्यावी. शेणखत अथवा कंपोष्ट खताची उपलब्धता नसल्यास ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा. त्याचप्रमाणे समृद्ध बायोकंपोष्ट खत तसेच द्विदलवर्गीय पिकांचे बेवड घ्यावे. ऊस लागवडीसाठी कमीतकमी 5,6 किंवा 7 फुट रुंदीच्या 6 ते 8 इंच खोलीच्या सऱ्या पाडाव्यात.

* ऊस लागवडीसाठी बेण्याची निवड : ऊस लागवडीसाठी त्रिस्तरीय बेणे मळ्यातील ऊस बेण्याचा वापर करावा. बेणे भेसळरहित 9 ते 11 महिने वयाचे असावे. बेणे जाड, रसरशीत, लांब कांड्याचे असावे. डोळ्यांची वाढ चांगली झालेली असावी व डोळे फुगीर असावे. बारा महिन्यापेक्षा जास्त वयाचा ऊस बेण्यासाठी वापरू नये. पाण्याचा ताण पडलेला आखूड कांड्यांचा, दशी पडलेला, पोकळ ऊस बेणे म्हणून वापरू नये. दर 3 ते 4 वर्षातून एकदा बेण्यात बदल करावा.

* ऊस लागवडीसाठी ऊस जाती : आडसाली ऊस लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेल्या सुधारित जातींची खालीलप्रमाणे: 
* को- 86032(नीरा) : मध्यम ते उशिरा पक्व होणारा वाण असून, साखरेचे प्रमाण अधिक आहे. या वाणात तुरा येण्याचे प्रमाण कमी आहे.खोडव्यासाठी उत्तम वाण आहे.काणी व गवताळ वाढ रोगास हा वाण मध्यम प्रतिकारक असून, पाण्याचा ताण काही प्रमाणात सहन करतो.या वाणाची पाने गर्द हिरवी असून उसाचा रंग अंजिरी आहे. कांड्यावर काही प्रमाणात भेगा आढळतात. पाने सरळ वाढतात.या वाणाच्या पानांच्या देठावर कूस नसल्याने वाढ्यांचा उपयोग जनावरांना चाऱ्यासाठी होतो.उसाचे व साखरेचे सरासरी उत्पन्न आडसाली (159,22.5 मे. टन)आहे.

* को एम 0265 (फुले 265) : अधिक ऊस व साखर उत्पादन, तसेच मध्यम साखर उतारा देणारा आहे. मध्यम पक्वता गटात मोडतो.या वाणामध्ये गाळपलायक उसाची संख्या, उसाची जाडी व उसाचे वजन जास्त असल्याने हेक्‍टरी ऊस व साखरेचे अधिक उत्पादन मिळते. हा वाण आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू या तिन्ही हंगामांत चांगला येतो. उसाचे व साखरेचे सरासरी उत्पादन आडसाली (200,26 .82 मे. टन) व खोडवा (130,17.41 मे. टन) अनुक्रमे येते.
हा वाण मध्यम ते भारी जमिनीत, तसेच खारवट व चोपण जमिनीतही चांगले उत्पादन देतो. पाण्याचा ताण सहन करतो.पाने हिरवीगार, तुऱ्याचे प्रमाण अत्यल्प आणि देठावर कूस कमी असल्याने वाढ्यांचा उपयोग चाऱ्यासाठी होतो. या वाणाचे पाचट सहज निघते, त्यामुळे तोडणी करणे सुलभ जाते.या वाणाच्या खोडव्याची फूट व वाढ चांगली असल्याने एकंदर उत्पादनही चांगले मिळते.हा वाण चाबूक काणी, मर व लालकूज या रोगांना प्रतिकारक आहे, तसेच खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड व लोकरी मावा या किडींचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)