आडवाटेवरचं कोल्हापूर पर्यटन सहलीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर- कोल्हापूरला पर्यटन विश्वात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आडवाटेवरचं कोल्हापूर हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून, यामध्ये राज्याच्या अन्य जिल्ह्यातील अर्ध्या पर्यटकांचा सहभाग असेल.या उपक्रमातून जवळपास 1400 पर्यटकांना कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक, निसर्ग पर्यटनाचा ठेवा पहायला मिळणार आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केले.

हिल रायडर्स फाऊंडेशन व ॲक्टिव्ह चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित केलेल्या आडवाटेवरचं कोल्हापूर या उपक्रमांतर्गत 26 मे अखेर आयोजित केलेल्या 14 पर्यटन सहलींचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि चित्रपट अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. शाहू स्मारक येथून आजच्या पर्यटन सहलीच्या 2 बसेसना पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि चित्रपट अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवून या गाड्या सहलीसाठी रवाना करण्यात आल्या. या समारंभास सौ. अंजली चंद्रकांत पाटील, चित्रपट अभिनेते भरत जाधव यांच्या पत्नी डॉ. सरीता जाधव, प्रमोद पाटील, डॉ.अमर अडके, उदय गायकवाड, अनिल चौगुले, अनंत खासबागदार, चारुदत्त जोशी, विद्याप्रबोधनीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे, सहकार विभागाचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

कोल्हापूरमध्ये पर्यटन विकासाची मोठी क्षमता आणि संधी असून, अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी अनोळखी आहेत. आडवाटेवरचं कोल्हापूर सारख्या सहलींच्या माध्यमातून कोल्हापूरातील नव नवीन पर्यटन स्थळे राज्यातील पर्यटकांना   अनुभवण्याची नामी संधी मिळणार असल्याचे मत यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)