आडवाटेवरचं कोल्हापूर ऑनलाईन नोंदणीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर – कोल्हापूरला पर्यटन विश्वात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आडवाटेवरचं कोल्हापूर हा नाविन्यपूर्ण उपक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून राबविण्यात येत आहे. या सहलीच्या ऑनलाईन नोंदणी सुविधेचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला.

कोल्हापूरमध्ये पर्यटन विकासाची प्रचंडमोठी क्षमता असून, अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी अनोळखी आहेत. यामधील आठ ठिकाणांचा समावेश असणारी दोन दिवसांची संपूर्णत: मोफत सहल एप्रिल व मे महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. दि. 13 एप्रिल पासून दर शुक्रवार व शनिवारी होणाऱ्या या सहलीचा पर्यटकांना लाभ घेता यावा यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सुविधेचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी आडवाटेवरचं कोल्हापूर या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.आडवाटेवरचं कोल्हापूर ऑनलाईन नोंदणीचा सुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शासकीय विश्रामगृह येथे झाला. यावेळी संदीप देसाई, अनिल चौगुले, अमर अडके, उदय गायकवाड, अनिल पाटील, राहूल कुलकर्णी, आर.डी.पाटील, चारुदत्त जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोल्हापूरच्या पर्यटन वृध्दीसाठी गेल्या काही दिवसांपासून जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की,राजर्षी शाहू महाराज यांनी उभारलेल्या वास्तु, विकसित केलेली स्थळे याशिवायही जिल्ह्यात नव्याने पर्यटन स्थळे विकसित होणे आवश्यक आहे.  अलीकडील काळात  कोल्हापूरातील रस्ते  सुशोभिकरण, 303 फुट उंच ध्वजस्तंभासह पोलीस उद्यानाचे सुशोभिकरण, हायवेवरील नेचर गार्डन, फ्लॉवर फेस्टीवल, टुर ऑपरेटर्सची जिल्ह्यात विविध ठिकाणांना 5 दिवसाची भेट असे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)