आडते असोसिएशनची सर्वसाधारण सभेत अध्यक्ष-माजी अध्यक्ष खडाजंगी

Gultekdi Marketyard would be shut down from Monday following the strike call given by Traders and commission agents . Express Photo By Sandeep Daundkar, Pune,09.07.2016

डाळींब यार्डावरून दोघांत वाद : मराठी भाषा, आडत वसुली, तोलाई, परवान्यावरून आडते आक्रमक

पुणे – डाळींब यार्डातील जागावाटप, थकलेली तोलाई, आडत वसुली, बाजार आवाराची शिस्त आदी विविध मुद्‌द्‌यांवरील आरोप-प्रत्यारोपांनी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनची वार्षिक सभा गाजली. शनिवारी झालेल्या सभेमध्ये विद्यमान अध्यक्ष विलास भुजबळ आणि माजी अध्यक्ष शिवलाल भोसले यांमध्ये डाळींब यार्डातील करण्यात आलेल्या कारवाईवरून जोरदार खंडाजंगी झाली.

आडते असोसिएशनने येथील डाळींब यार्डवरून बाजार बंदची भूमिका घेण्यात आली होती. त्यासाठी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती का, असा सवाल माजी अध्यक्ष शिवलाल भोसले केला. संघटना म्हणजे लोकांचे एकत्र संघटन आहे. त्यातून सभासदांचे प्रश्‍न मार्गी लावले जातात, असे असताना सभासदांना त्यांची मते मांडू न देता बंद कसा केला, याचा खुलासा करावा अशी मागणी अध्यक्षांकडे केली. यावर, खुलासा करताना भुजबळ यांनी कांदा, बटाटा बंद ठेवण्यासाठी त्या विभागातील व्यापाऱ्याची बैठक घेत बहुमताने निर्णय घेतला होता. तुम्ही दिलेल्या पत्रावर केवळ पाचच सह्या होत्या. एका विशिष्ठ विभागाचा विषय असल्याने निर्णय घेतल्याचे सांगितले. दरम्यान, डाळींब यार्डासाठी जागा देताना ती कोणत्या निकषावर देण्यात येणार आहे. याबाबत प्रशासकांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन आडते सौरभ कुंजीर यांना देण्यात आले.

ज्येष्ठ आडते गणेश घुले म्हणाले, बाजार समितीवर आडते असोसिएशनचा वचकच राहिला नाही. आंबा, जांभूळ, डाळींब या फळांसाठी स्वतंत्र शेड उभारून दिले जात आहे. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारातील असणारे गाळे ओस पडू लागले आहेत. अगोदरच बाजारात मंदी आहे त्यातच पुन्हा मंदीचा सामना करावा लागत आहे. सभेदरम्यान, आडत्यांना गाळ्याव्यतिरिक्त स्वतंत्र जागा न देता कॉमन सेलसाठी जागा द्यावी, बाजार दुपारी बारा वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येईल, असा ठराव मंजूर करण्यात आला. याखेरीज, बाजार समितीने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त वाराई वसुली केली जात असल्याचा मुद्दाही सभासदांनी उपस्थित केला यावर प्रशासकांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे आश्‍वासन भुजबळ यांनी दिले.

टप्प्याटप्प्याने बाजाराचा पुनर्विकास
बाजार आवारातील फळे, भाजीपाला विभागातील आडत्यांना विश्‍वासात घेवून पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात येईल. याप्रकरणी एक ते दीड महिन्यात निर्णय घेण्यात येईल. पुनर्विकासामुळे कोणत्याही घटकाला अडचण होणार नाही. याबाबत खबरदारी घेतली जाईल, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. सर्वसाधारण सभेत फळे, भाजीपाला विभागातील पाकळ्या कमकुवत झाल्या असून त्याचा पुनर्विकासाचा मुद्दा विलास भुजबळ यांनी उपस्थित केला. त्यावेळी दोन्ही विभागातील पाकळ्यांची दुरवस्था झाली असून त्यांचा पुनर्विकास करावा याकडेही आडत्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, याबाबत बाजार समितीच्या प्रशासकांबरोबर प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे. यावेळी त्यांना पुनर्विकास करताना आडत्यांकडून एक रूपयादेखील दिला जाणार नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)